पश्चिम महाराष्ट्र

गुरुजींचा ड्रेसकोड : अंमलबजावणीसाठी 28 दिवसांचा अवधी शिल्लक

संतोष सिरसट

सोलापूर - जिल्ह्यातील जवळपास 10 हजार गुरुजींना शाळेत 19 नोव्हेंबरपासून ब्लेझर घालावा लागणार आहे. त्यासाठी अद्यापही 28 दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. मात्र, या 28 दिवसांमध्ये जिल्ह्यातील 10 हजार गुरुजींना ब्लेझर उपलब्ध होणार का? हा खरा प्रश्‍न आहे. ब्लेझरच्या खरेदीसाठी गुरुजींची अद्याप कोणतीही हालचाल दिसून येत नाही. 

दिवाळीच्या सुटीनंतर जिल्हा परिषदेच्या गुरुजींना ब्लेझर घालणे बंधनकारक केले आहे. ब्लेझरचा हा विषय केवळ गुरुजींपुरताच मर्यादित न राहता केंद्रप्रमुखांपासून ते शिक्षणाधिकाऱ्यांपर्यंतच्या अधिकाऱ्यांनाही तो घालावा लागणार आहे. केवळ काळ्या रंगाचा ब्लेझर शिवण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. एवढ्या शिक्षकांना एकाच वेळी ब्लेझर उपलब्ध होणार का? याबाबतही तर्क-वितर्क लढविले जात आहेत.

ब्लेझरसाठी लागणारा काळ्या रंगाचा कपडा खरेदी करून तो शिंप्याकडून शिवून घ्यावा लागणार आहे. यानिमित्ताने शिंप्यांना रोजगार उपलब्ध होईल. एका शाळेतील गुरुजींनी एकत्र येऊनच ब्लेझरची किंवा ब्लेझरच्या कापडाची खरेदी करावी लागेल. पुढील 15 दिवसात दिवाळी आहे. त्या दिवाळीला सगळ्यांनाच कपडे घ्यावे लागतात. त्याचवेळी ब्लेझरही खरेदी करण्याचा गुरुजींचा विचार आहे. ब्लेझरसाठी वापरणारे कापड कशा पद्धतीचे आहे, त्यावर त्याला येणारा खर्च किती हे अवलंबून आहे. कापडाची खरेदी केल्यानंतर त्याच्या शिलाईसाठी वेगळे पैसे द्यावे लागणार आहेत. प्रत्येक तालुक्‍यातील गुरुजींनी एकत्र येऊन ब्लेझरची खरेदी केल्यास त्यांना तो स्वस्त बसण्याची शक्‍यता आहे. आता गुरुजी कोणत्या पद्धतीने ब्लेझरची खरेदी करतात, याकडे शिक्षण विभागाचे लक्ष लागले आहे. 

एकाच वेळी 60-70 पुरवठादारांनी एकत्र आल्यास 10 हजार ब्लेझर महिनाभरात उपलब्ध करून देता येतील. हे काम क्‍लस्टरमार्फत करावे लागेल. ब्लेझर घालण्याची स्पेशालिटी आपल्याकडे नाही. त्यामुळे ते सहजासहजी बाजारात उपलब्ध होत नाहीत. नॉर्मल कपडा असलेला ब्लेझर सगळ्यांनी एकत्र घेतल्यास दीड हजार रुपयांपर्यंतचा खर्च येईल. - अमित जैन, सचिव, श्री सोलापूर रेडिमेड कापड उत्पादक संघ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT