पश्चिम महाराष्ट्र

आंतरजिल्हा बदलीचा तिसरा टप्पा सुरू 

संतोष सिरसट

सोलापूर - ग्रामविकास विभागाने मागील वर्षीपासून शिक्षकांच्या आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदल्या ऑनलाइन पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे अनेक गुरुजींनी स्वागत केले तर काही गुरुजींनी नाराजीही व्यक्त केली. यंदाच्या आंतरजिल्हा बदलीच्या शिक्षकांची बदली प्रक्रिया सुरू झाली आहे. येत्या 15 नोव्हेंबरपर्यंत बदलीपात्र गुरुजींना ऑनलाइन अर्ज भरावा लागणार आहे. 

राज्यातील गुरुजींच्या ऑनलाइन बदल्यांचा विषय खूपच गाजला होता. संघटनांनी याला विरोधही केला होता. मात्र, सरकार बदल्यांमध्ये होणारी चमचेगिरी बंद करण्याच्या विचारात होते. त्यामुळे त्यांनी गेल्या वर्षीपासून ऑनलाइन बदली प्रक्रिया सुरू केली आहे. 27 फेब्रुवारी 2017 च्या शासन निर्णयान्वये गुरुजींच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यंदाच्या वर्षी पहिल्यांदा आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया सुरू केली आहे.

एक नोव्हेंबरपासून सुरू झालेली ही प्रक्रिया 15 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. ज्या गुरुजींनी यापूर्वी बदलीसाठी अर्ज केले आहेत, ते अर्जही ऑनलाइनला उपलब्ध करून दिले आहेत. त्या अर्जामध्ये दुरुस्ती करण्याची किंवा ते अर्ज काढून टाकण्याची सुविधाही गुरुजींना दिली आहे. त्याचबरोबर ज्या गुरुजींना नव्याने अर्ज भरायचा आहे, त्यांनाही तशी सुविधा दिली आहे. ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर तो सेव्ह केल्याशिवाय त्याचा बदलीसाठी विचार केला जात नाही. यंदाच्या वर्षी अर्ज व्हेरीफाय करण्यासाठी गुरुजींचा मोबाईल क्रमांक अनिवार्य केला आहे. त्यावर ओटीपी आल्यानंतर तो संगणकीय प्रणालीमध्ये भरल्यावर त्यांच्या अर्ज स्वीकारला जाणार आहे. आंतरजिल्हा बदली प्रक्रियेमध्ये संवर्गाचाही विचार केला जाणार आहे. 

तर गुरुजींची बदली नाही 
एखाद्या जिल्हा परिषदेमध्ये 10 टक्‍यांपेक्षा जास्त जागा रिक्त असल्यास त्याठिकाणच्या गुरुजींना आंतरजिल्हा बदलीने बाहेर जाता येणार नाही. त्या जिल्ह्यातून बाहेर जाण्यासाठी रिक्त पदांची संख्या 10 टक्‍यांपेक्षा कमी असणे गरजेचे आहे. तरच गुरुजींना परजिल्ह्यातून स्वजिल्ह्यात जाता येणार आहे. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT