पश्चिम महाराष्ट्र

350 वर्षांच्या परंपरेला गालबोट लावणाऱ्या तहसीलदार समिंदर यांना बडतर्फ करावे

हुकूम मुलाणी

मंगळवेढा  - गेल्या 350 वर्षापासून शमीच्या झाडाचे पूजन करून सीमोल्लंघन व शस्त्र पुजेची शिवकालीन परंपरा एकवीरा माळावर आहे. यासाठी सिमोल्लंघनाचे रितसर निमंत्रण देण्यास गेलेल्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या समोर उद्धट वर्तन करून धार्मिक भावना दुखावाणाऱ्या तहसीलदार आप्पासाहेब समिंदर यांना तातडीने बडतर्फ करावे अशी मागणी जय मल्हार क्रीडा युवक सेवा मंडळाचे अध्यक्ष मारूती वाकडे यांनी केली.

वाकडे म्हणाले, मंगळवेढयातील एकविरा माळावरील सिमोलंघनाचा तहसीलदारांचा मान असतो. याबाबतचे निमंत्रण देण्यासाठी ते प्रांत कार्यालयात असल्याने तहसीलदारांच्या हस्ते व प्रांताधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम असल्याचे सांगून तहसीलदारांच्या हातात पत्रिका दिली असता असल्या फालतू प्रथा बंद करा, मी कार्यक्रमाला येणार नाही. त्यावेळेस वरिष्ठ अधिकार्‍यांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. तरीही त्यांना न जुमानता आपला तोरा कायम ठेवत कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. त्यामुळे मंडळ अधिकार्‍याकडून पुजा उरकून घ्यावी लागली. तहसिलदार समिंदर यांनी 350 वर्षाच्या प्रथेला गालगोट लावून तमाम मंगळवेढेकरांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. जनतेचे सोयर सुतक नसलेल्या अधिकार्‍याला इथल्या प्रथेचे काही देणे घेणे नाही. अशा अधिकार्‍याला तहसीलदारांच्या मानाच्या खुर्चीवर बसायचा काडीचा अधिकार नाही. वरिष्ठ अधिकार्‍यांनी गांर्भियांने या घटनेची दखल घेवून समिंदर यांनी बडतर्फ करावे अन्यथा मंगळवेढेकरांसमवेत तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा वाकडे यांनी दिला.

दरम्यान, या प्रकाराबाबत तहसिलदार आप्पासाहेब समींदर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांची प्रतिक्रिया उपलब्ध झाली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: उदयनराजेंच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी कराडमध्ये दाखल

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT