tembhu upsa irrigation scheme water to maan river bursting of firecrackers Sakal
पश्चिम महाराष्ट्र

Sangola News : टेंभूचे पाणी माण नदीत पोहोचल्याने पाणी पूजन व फटाके फोडून झाला जल्लोष

टेंभू उपसा सिंचन योजनेतून सुमारे ४०० क्युसेक्स विसर्गाने सोडलेले पाणी माण नदीत पोहचल्याने शेतकरी वर्गाचा आनंद ओसंडून वाहू लागला

दत्तात्रय खंडागळे :

सांगोला : टेंभू उपसा सिंचन योजनेतून सुमारे ४०० क्युसेक्स विसर्गाने सोडलेले पाणी माण नदीत पोहचल्याने शेतकरी वर्गाचा आनंद ओसंडून वाहू लागला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने व पाणीदार आमदार अँड शहाजी पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे माण नदीत सोडलेल्या टेंभूच्या पाण्याचे शेतकऱ्यांसह शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडून, खणा नारळाची ओटी पाण्यात सोडून जलपूजन केले.

चालू वर्षी मान्सून पूर्व पावसासह सर्वच नक्षत्रातील पावसाने पाठ फिरवल्यामुळे सांगोला तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. मागील तीन महिन्याच्या काळात एकही दमदार पाऊस न पडल्यामुळे तालुक्यातील ओढे, नाले, नद्या तसेच तलाव कोरडे पडल्यामुळे शेतीच्या पाण्यासह माणसांच्या व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली होती.

तालुक्यातील शेतकऱ्यांनी आमदार शहाजी पाटील यांच्याकडे निरा उजवा कालवा, टेंभू व म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून कोरडा नदी, माण नदीत पाणी सोडून नदीवरील सर्व बंधारे भरून घ्यावेत अशी मागणी केली होती.

या मागणीची दखल घेऊन आमदार शहाजी पाटील यांनी पावसाळी अधिवेशनात सभागृहात लक्षवेधी सूचना मांडून सदर टेंभू ,म्हैसाळ योजनेतून माण व कोरडा नदीत पाणी सोडण्याची मागणी केली होती.

याबाबत आमदार पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही लेखी पत्र देऊन पाणी सोडण्याची मागणी लावून धरली होती. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने व आमदार शहाजी पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे टेंभूचे पाणी माण नदीत सोडल्यामुळे शेतकरी वर्गातून आनंद व्यक्त होत आहे.

सुमारे ४०० क्युसेक्स वेगाने पाणी बलवडीपासून ते मेथवडे बंधाऱ्याकडे आगेकूच करीत आहे. दरम्यान माण नदीत पाणी आल्यामुळे वाटंबरे येथील शेतकऱ्यांनी आमदार शहाजी पाटील यांचे आभार मानून आनंद व्यक्त केला. यावेळी शेतकऱ्यांसह शिंदे गटाच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडून खणा नारळाची ओटी पाण्यात सोडून जल पूजन केले. याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख दादासाहेब लवटे,

प्रा. संजय देशमुख, युवा सेना तालुकाप्रमुख दिपक खटकाळे, माणगंगा सह सा. का.संचालक दादासाहेब वाघमोडे, पांडुरंग मिसाळ, दीपक दिघे, सचिन शिंदे, धीरज पवार, सुबराव पवार, खंडू पवार, तातोबा येलपले, दत्तात्रय मासाळ यांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Theft : लॉकरचा पासवर्ड चोरला अन् १७ हजार डॉलर्सवर मारला डल्ला; पुण्यात ऑफिस बॉयचा कारनामा!

Weekend Special Recipe: वीकेंडला घरीच १५ मिनिटांत बनवा हॉटेल स्टाइल 'तंदूर पनीर टिक्का', सगळ्यांचं तोंडात पाणी सुटेल

आजचे राशिभविष्य - 10 जानेवारी 2026

Makar Sankranti 2026: मकर संक्रांतीला काळे कपडे का घातले जातात? कारण ऐकून थक्क व्हाल!

Panchang 10 January 2026: आजच्या दिवशी शनि वज्रपंजर कवच स्तोत्राचे पठण व ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT