पश्चिम महाराष्ट्र

कडेगावात टेंभूच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको

संतोष कणसे

कडेगाव - येथील लघु पाटबंधारे तलावाचा टेंभू योजनेच्या लाभ क्षेत्रात समावेश करावा. टेंभूचे शेतीसाठीचे आवर्तन नियमित द्यावे आदी विविध मागण्यासाठी येथील विजापूर- गुहागर राष्ट्रीय महामार्गावर शेतकऱ्यांनी सामाजिक कार्यकर्ते डी. एस. देशमुख व श्रमिक मुक्तीदलाचे नेते मोहनराव यादव यांच्या नेतृत्वाखाली दोन तास रास्ता रोको आंदोलन केले.

तालुक्यात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस गंभीर होत आहे. खरीप वाया गेला आहे तर रब्बी हंगाम पुरेशा पाण्याअभावी संकटात आहे. कडेगाव शहरासह परिसरात तीव्र पाणी टंचाई भासू लागली आहे. तलावातील पाणीसाठा कमी होवू लागल्याने कडेगाव शहरासह कडेपूर, नेर्ली गावाच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. पाण्याअभावी पिके वाळू जाण्याच्या मार्गावर आहेत. शेतकऱ्यांची पाणीपट्टी घेतली जाते. परंतु पाणी वेळेत दिले जात नाही. कडेगाव तलावात कायमस्वरुपी पाणी सोडावे, म्हणून अनेकवेळा मोर्चे काढण्यात आले परंतु अद्याप याबाबत तोडगा निघाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांत प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. म्हणून आज कडेगाव येथे राष्ट्रीय महामार्गावर संतप्त शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. 

यावेळी आंदोलनकर्त्यांनी पाणीप्रश्नी टेंभूचे सहायक कार्यकारी अभियंता नरेंद्र घार्गे यांना चांगलेच धारेवर धरले. त्यांनी कडेगाव तलावात पाणी सोडण्यात येईल व अन्य मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. तसेच यावेळी विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसिलदार राजेंद्र यादव व टेंभूचे नरेंद्र घार्गे यांना देण्यात आले.

सामाजिक कार्यकर्ते डी. एस. देशमुख, श्रमिक मुक्ती दलाचे नेते मोहनराव यादव, युनुस पटेल, महेंद्र करांडे, संजय तडसरे, सुभाष गाढवे, राजेंद्र राऊत, फिरोज बागवान, सुनील पवार, सुनील गाढवे, प्रकाश शिंदे, सिराज पटेल, दीपक शेडगे, अनिल देसाई  भरत माळी, राहुल चन्ने, राजाराम माळी उपस्थित होते. 

कडेगाव येथील लघु पाटबंधारे तलावात येत्या आठ दिवसात पूर्ण क्षमतेने पाणी सोडण्यात येईल. तसेच आवर्तने वेळेत दिली जातील. शेतकऱ्यांच्या इतर मागण्या पूर्ण करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा केला जाईल.
- नरेंद्र घार्गे, 
सहाय्यक अभियंता टेंभू सिंचन योजना.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT