bhalke
bhalke 
पश्चिम महाराष्ट्र

पक्ष बदलण्याचा विचार नाही - भारत भालके

हुकूम मुलाणी

मंगळवेढा - तालुक्यातील दुष्काळी शेतकऱ्याला सवतीची वागणूक देणाऱ्या पक्षात मी कशाला जावू उलट राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या नेत्यानी पोटच्या मुलासारखे संभाळले. दुष्काळात मी पक्ष बदलणार असल्याच्या नुसत्या वावड्या असल्याचे सांगत भालके यांनी पक्ष बदलाच्या चर्चेला पुर्णविराम दिला.

येथील श्रीराम मंगल कार्यालयात टंचाई आढावा बैठक घेण्यात आली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. भालके म्हणाले की, पंढरपूरातील काँग्रेस मेळाव्यातही माझ्या बोलल्याचा विपर्यास 'ध चा मा' करण्यात आला. माझ्या घरातील कोणी आमदार खासदार नाहीत जनता हिच माझी आहे. यावेळी सत्ताधाऱ्यांनी मंगळवेढा सोडून अन्य तालुक्याला निधी दिला मग मंगळवेढ्यावरच अन्याय का असा सवाल उपस्थित केला.

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व सुशिलकुमार शिंदे हे पोटच्या मुलासारखे संभाळतात तर काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेत दोन माजी मुख्यमंत्री माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्यावर पक्ष बदलण्याचे का आठवेल. असे म्हणत उलट पुढील महिन्यातही मला दुष्काळी उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार करावा लागेल याचाही अर्थ 'लैला मजनू' सारखा कुणी काढू नये.

यावेळी नगराध्यक्षा अरूणा माळी, जि.प.सदस्य नितीन नकाते, उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड, तहसिलदार आप्पासाहेब समिंदर,गटविकास अधिकारी राजेन्द्रकुमार जाधव, मुख्याधिकारी निलेश देशमुख कृषी अधिकारी नामदेव गायकवाड, महावितरणचे संजय शिंदे, सहायक निंबधक म्हाळाप्पा शिंदे, नायब तहसिलदार गणेश लव्हे, पशुधन अधिकारी डॉ दादासाहेब मेटकरी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ नंदकुमार शिंदे, प्रकाश गायकवाड लतीफ तांबोळी सह विविध खात्याचे अधिकारी कृषीसहायक, तलाठी, ग्रामसेवक व सरपंच, पदाधिकारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uma Ramanan: तामिळ चित्रपटसृष्टीचा आवाज हरपला, दिग्गज गायिकेचे निधन

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

PM Narendra Modi : 'मोदींचे निधन झाले तर कोणी पंतप्रधानच होणार नाही का?' काँग्रेस आमदाराचे पुन्हा वादग्रस्त विधान

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

Latest Marathi News Live Update : थंडा थंडा कूल कूल, विद्यार्थ्यांसाठी शाळेने बनवला वर्गातच स्विमिंग पूल

SCROLL FOR NEXT