Fadnavis 
पश्चिम महाराष्ट्र

कॉंग्रेसच्या ट्रॅक्‍टर मोर्चात एकही शेतकरी नव्हता ः फडणवीस 

धर्मवीर पाटील

इस्लामपूर (सांगली) ः सन 2006 साली कॉंग्रेसने महाराष्ट्रात कंत्राटी शेतीचा कायदा काढला. त्यानंतर महाराष्ट्रात टाटा, बिर्ला, अदानी, अंबानीने किती जमिनी हटप केल्या सांगाव्यात. कॉंग्रेसने कायदा केला तर तो चांगला आणि मोदीजींनी त्याहून चांगला कायदा केला केला तर त्याविरोधात ट्रॅक्‍टर मोर्चाचा फार्स करायचा. त्या ट्रॅक्‍टर मोर्चात एकही शेतकरी नव्हता, अशी टीका माजी मुख्यमंत्री तथा विरोधा पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली. 


रयत क्रांती संघटना आणि किसान मोर्चातर्फे आयोजित किसान आत्मनिर्भर यात्रेच्या सांगता समारंभात श्री. फडणवीस बोलत होते. कॉंग्रेसने सांगलीत कृषी कायद्याचा निषेध करण्यासाठी ट्रॅक्‍टर रॅली काढली होती. त्यावर फडणवीस यांनी टीका केली. 


त्यांनी कॉंग्रेससह डाव्या पक्षांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, ""दिल्लीत डाव्या विचारांचे कम्युनिष्ट मोर्चा काढत आहेत. कृषी कायद्यामुळे बाजार समित्या मोडीत निघतील, असा आरोप करत आहेत. वास्तविक, त्यांचे राज्य असलेल्या केरळ राज्यात कुठे आहेत बाजार समित्या? किती टोकाचा विरोधाभास आहे हा? किती खोटे बोलायचे? ही दुटप्पी व दोगली भूमिका आहे.'' 


ते म्हणाले, ""मोदीजींनी शेतकऱ्यांना देशाची बाजारपेठे खुली करून दिली आहे. किसान रेलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना माल देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात जावू शकतो. तेथे शेतकऱ्यांना कुणीही अडवणार नाही. एक देश, एक बाजारपेठ होईल. तेथे कुणी सेस मागणार नाही. शेतकरीच बाजाराचा मालक होईल. आडत्या आणि दलालांच्या ताब्यातून बाजारपेठ मोकळी होईल.'' 


ते म्हणाले, ""पश्‍चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्याला न्याय कुणी मिळवून दिला. मोदीजींनी धोरण ठरवले आणि उसाला पूर्ण एफआरपी देता यावी म्हणून साखरेचा किमान दर निश्‍चित केला. शेतकऱ्यांना साडेतीन हजार कोटीचे अनुदान थेट देण्याची व्यवस्था केली. साखर कारखानदारी कधीच बुडणार नाही, अशी व्यवस्था करण्यासाठी साखरेशिवाय इथेनॉल निर्मितीसाठीचे पक्के धोरण ठरवले.'' 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Election : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना अटक करा, त्यांच्या देखरेखीखाली झालेल्या निवडणुका पुन्हा घ्या; ममता बॅनर्जींची आक्रमक मागणी

Nilanga News : देवाभाऊ तुम्ही एवढं आलेलं आस्मानी संकट टाळा तुम्ही भाऊ हाव आमचे.....; अनेक महिला शेतकऱ्यांनी दुष्काळाच्या मांडल्या व्यथा

₹1500 Installment Payment Update : लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी! 'या' तारखेनंतर खात्यात जमा होणार ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये; 1 कोटी 66 लाख महिलांना मिळणार लाभ

Marathi News Live Updates : गणेशोत्सवाचे शेवटचे दोन दिवस; श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

Cricketer Retirement: रुटचा क्रिकेटला अलविदा! निवृत्ती घेताना म्हणाला, '१४ वर्षात अनेक चढ-उतार आले, पण...'

SCROLL FOR NEXT