Thermal scanning through machines in Belgaum district
Thermal scanning through machines in Belgaum district 
पश्चिम महाराष्ट्र

बेळगाव जिल्ह्यात 200 मशिनद्वारे थर्मल स्कॅनिंग ; मोठया प्रमाणात आरोग्य तपासणी

सकाळवृत्तसेवा

बेळगाव - कोरोनाचा विस्तार रोखण्यासाठी आरोग्य खात्यातर्फे बेळगाव जिल्ह्यात 200 थर्मल स्कॅनिंग मशीनद्वारे आरोग्य तपासणी केली जात आहे.याला नागरिकांमधून चांगला प्रतिसाद मिळत असून थर्मल स्कॅनिंग मशीनची संख्या वाढविली जाणार आहे अशी माहिती आरोग्य खात्यातर्फे देण्यात आली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारतर्फे विविध  उपाय योजना हाती घेण्यात आल्या आहेत.त्यानुसार आरोग्य खात्यातर्फे प्रमुख ठिकाणी थर्मल स्किनिंग करून लोकांची आरोग्य तपासणी केली जात असून त्यानुसार नागरिकांना आवश्यक त्या सूचना करण्याचे काम तीव्र गतीने हाती घेण्यात आले आहे. ज्या लोकांमध्ये तापाची लक्षणे दिसून येत आहेत त्यांना सूचना केल्या जात आहेत अशी माहिती आरोग्य खात्यातर्फे देण्यात आली आहे.

थर्मल स्कॅनिंग करताना अनेकांचे तापमान एक सारखेच येत आहे त्यामुळे थर्मल स्कॅनिंगद्वारा केली जाणारी आरोग्य तपासणी योग्य प्रकारे होत आहे का असा प्रश्न काही जणांकडून उपस्थित केला जात आहे. मात्र कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ठिकठिकाणी केले जात असलेले थर्मल स्किनिंग योग्य असून अनेकांचे तापमान एक सारखेच असू शकते असे स्पष्ट करण्यात आले आहे. एकाद्या व्यक्तीचे थर्मल स्किनिंग केल्यानंतर त्या व्यक्तीचे तापमान दिसून येते त्यानंतर संबंधित व्यक्तीला आरोग्य खात्यातर्फे सूचना केल्या जात असून शहरी भागासह ग्रामीण भागात केले जात असेलेले थर्मल स्कॅनिंग आरोग्य खात्यासाठी लाभदायक ठरत असल्याचे दिसून आले आहे.


आरोग्य खात्याच्या माहितीनुसार बेळगाव जिल्ह्यात 200 मशिनद्वारे आरोग्य तपासणी जात आहे. यामध्ये 8 थर्मल स्किनिंग मशीनद्वारा विविध ठिकाणी असलेल्या चेकपोस्टवर तपासणी केली जात आहे. तर 139 प्राथमिक आरोग्य केंद्र, 19 समुदाय आरोग्य केंद्र, 9 तालुका आरोग्य केंद्रावरही मशिनद्वारे तपासणी केली जात आहे. तसेच निर्जंतुकीकरण कक्ष असलेल्या ठिकाणीही 12 तपासणी सुरू असून कुणाला ताप आहे व कुणाला ताप नाही याची माहिती काही वेळात मिळत असल्याने औषधोपचार करण्यात मदत आहे. त्यामुळे कोरोना रोखण्यासाठी थर्मल स्कॅनिंग मशीन फायदेशीर ठरत आहेत.

थर्मल मशीनद्वारे दररोज मोठ्या प्रमाणात तपासणी केली जात असून गरज पडल्यास मशीनची संख्या वाढविली जाणार आहे
डॉ. एम. एम. पल्लेद, जिल्हा मलेरिया नियंत्रणाधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

Onion Export: केंद्रानं खरंच कांदा निर्यातबंदी उठवली की केवळ निवडणूक जुमला? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT