These items will be available from ration shops in Sangli 
पश्चिम महाराष्ट्र

सांगलीतील रेशन दुकानातून मिळणार या वस्तू

सकाळवृत्तसेवा

सांगली ः रेशनिंग दुकानदारांचे उत्पन्न वाढावे आणि लोकांनाही एकाच ठिकाणी विविध प्रकारचे साहित्य मिळावे यासाठी परवानाधारक रेशनिंग दुकानात आता किराणा माल, स्टेशनरी साहित्य, बी-बियाणे, दूध, दुग्धजन्य पदार्थ, खादी ग्रामोद्योगमार्फत तयार होणाऱ्या विविध प्रकारच्या वस्तूंसह अन्य साहित्य ठेवण्यास राज्य सरकारने परवानी दिली आहे. यामुळे रेशनिंग दुकानदारांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण होणार आहे.

दुकानदारांना जादा उत्पन्न आणि लाभार्थ्यांना एका ठिकाणी अनेक वस्तू मिळतील. 
शहरासह ग्रामीण भागातील सर्वसामान्यांना शासकीय धान्य अल्प दरात देण्यासाठी शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागातर्फे काही दुकानदारांना परवाने देण्यात आले आहेत. त्यांच्यातर्फे शासकीय दरात संबंधित लाभार्थींना गहू, तांदूळ, साखर, डाळी, तेल हे साहित्य वर्षानुवर्षे दिले जात आहे. त्यानंतर चहा पावडर आणि सांबणांचेही वितरण करण्यात येते. त्याचे कमिशन संबंधित दुकानदारांना मिळते. तेही अत्यल्प असते.

अनेकदा धान्य पुरवठा करणारी पोती फाटकी असतात, काही वेळा पोती उचलताना, टाकताना धान्य सांडून वजनात घट येते. त्याचबरोबर संबंधित माल वाहतुकीचाही खर्च त्यांनाच करावा लागतो, यासह अन्य कारणांमुळे दुकानदारांना काहीवेळा पदरमोडही करावी लागते. त्यातच संबंधित मालाच्या विक्रीपोटी मिळणारे कमिशनही कमी असल्याने दिवसभर बसूनही त्यांना संबंधित व्यवसाय परवडत नाही. 

स्वस्त धान्य दुकानदारांनी मध्यंतरी सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानांचे परवाने परत घ्यावे अशी मागणी केली होती. त्याची दखल घेऊन शासनाने दुकानदारांचे उत्पन्न वाढावे आणि शासकीय धान्याबरोबरच त्यांना इतरही माल विकता यावा यासाठी महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. त्यामुळे दुकानदारांसाठी हा निर्णय दिलासादायक आहे. रेशन दुकान आता विविध प्रकारचे साहित्य मिळण्याचे केंद्र होणार आहे. ग्रामीण भागातील लाभार्थींची मोठी अडचण त्यामुळे दूर होणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Epstein files : रशियन पासून अफ्रिकन पर्यंत अशा निवडल्या जायच्या मुली, कसा ठरवला जायचा रेट? जगाला हादरवणारे High Profile Sex Scandal

Indian Railway Ticket : रेल्वे तिकीटावरील GNWL, RLWL, PQWL म्हणजे काय? RAC तिकीट कन्फर्म असतं का? प्रवासापूर्वी नक्की जाणून घ्या!

Latest Marathi News Live Update : माणिकराव कोकाटे यांच्या तब्येतीबद्दल लिलावती रुग्णालयाची चार वाजता पत्रकार परिषद

VIDEO : आईचा हात धरुन तलवार हातात घेत दिव्यांग मुलगा स्टेजवर चढला…; शिवरायांच्या वेशातील 'हा' व्हिडिओ पाहून तुमचेही डोळे पाणावतील

Eating Bread Daily: दररोज ब्रेड खाल्लं तर शरीरावर कोणते परिणाम होतात? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

SCROLL FOR NEXT