Thorat criticizes PM Narendra Modi 
पश्चिम महाराष्ट्र

भाजपने कोरोनाचाही इव्हेंट केला, मोदींच्या दिवे पाजळण्याच्या आवाहनावर बाळासाहेब भडकले

सकाळ वृत्तसेवा

संगमनेर ः देशात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. देश एका गंभीर संकटाचा सामना करीत आहे. अशा गंभीर संकटावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंभीर होवून काही महत्वाचे धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे. टाळ्या वाजवा, दिवे लावा असे आवाहन करण्याचे काम पंतप्रधानांचे नाही. आतातरी त्यांनी गंभीर व्हायला हवे, अशी खरमरीत टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

महाराष्ट्रातील जनतेला उद्देशून पंतप्रधान मोदींनी प्रसारमाध्यमावर केलेल्या वक्तव्याचा समाचार मंत्री थोरात यांनी घेतला. ते म्हणाले, कोरोनाचा सामना करण्यासाठी डॉक्टर, मेडीकल स्टाफ, पोलिस व प्रशासन यंत्रणा जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून त्यांना आवश्यक असलेली मदत करणे ही आजची गरज आहे.

लोकसंख्येच्या प्रमाणात जास्तीत जास्त व्हेंटीलेटर उपलब्ध करणे, प्रयोगशाळांची संख्या वाढवणे, डॉक्टर व त्यांच्या सहकार्‍यांना आवश्यक असलेले सुरक्षा कीट उपलब्ध करुन देणे तसेच राज्य सरकारांना जास्तीत जास्त मदत करणे, जनतेला धीर देणे, त्यासाठी केंद्र सरकारकडून भरघोस आर्थिक मदतीबरोबर सर्वप्रकारचे सहाय्य देण्यास प्राधान्य देणे हे त्यांचे काम आहे. दिवे लावणे, टाळ्या वाजवणे असे इव्हेंट करणे नाही. हे सर्व पाहता नरेंद्र मोदी पंतप्रधान सिरिअस दिसत नाहीत, असा सवाल उपस्थित होत आहे. 

तर देशाला मोठी किंमत मोजावी लागेल
राष्ट्रीय आपत्तीच्या काळात देशाला एका कणखर व जबाबदार नेतृत्वाची गरज असते. दुर्दैवाने भारतीय जनता पक्ष व त्यांच्या नेत्यांकडे ते नाही. कोणत्याही घटनेचा इव्हेंट करण्याचा एक रोगच त्यांना लागला आहे. याची देशाला मोठी किंमत मोजावी लागेल. कोरोनासारख्या राष्ट्रीय आपत्तीच्या वेळीही इव्हेंट करुन परिस्थीतीचे गांभीर्य घालवले जात असल्य़ाची टीका थोरात यांनी प्रसिध्दी पत्रकातून केली आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati OBC Politics: ओबीसी आंदोलनाचे नेते प्रा. लक्ष्मण हाके बारामती पोटनिवडणुकीत उतरले; सुनेत्रा पवारांना थेट आव्हान

Mumbai News: प्राण्यांसाठी विशेष ‘कूलिंग’ व्यवस्था, राणी बागेत वाढत्या उष्णतेचा तडाखा; प्रशासन सतर्क

'अश्लिल साइटवर माझा फोटो पाहिला आणि...' 15 व्या वर्षीच जान्हवी कपूरला आलेला वाईट अनुभव, म्हणाली...'एका दुसऱ्याच शरीराला...'

IPL 2026: आधी शमीने धक्के दिले अन् मग नितीश रेड्डी-क्लासेनने LSG च्या गोलंदाजांना फोडलं; SRH चा १५० धावांचा टप्पा पार

२० वर्षीय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरनं हाताची नस कापली, मनगटावर १८ वेळा वार; का उचललं टोकाचं पाऊल

SCROLL FOR NEXT