famine condition
famine condition 
पश्चिम महाराष्ट्र

उजनीला महापूर; माण मात्र धोक्यात

धनाजी यादव

मारापुर : उजनी लाभ क्षेत्रात पडलेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणात जादा झालेले पाणी कालवा आणि नदीच्या पात्रातून सोडले जात आहे. अशा परिस्थितीत नदीला महापूर आला परंतु अद्यापही माण नदीत पाणी सोडले नसल्यामुळे नदी काठची हजारो हेक्टर वरील शेती धोक्यात आली आहे.

दुष्काळी टप्प्यातील पावसाच्या पाण्यावर ठराविक दिवस वाहणारी माण ही एकमेव नदी आहे. इतर वेळी मात्र कोरडी ठणठणीत असते. भिमा नदीला जावून मिळणाऱ्या माणूसकी नदीला कालव्यातून जोडलेल्या पाण्यावर काही गावातील शेती जगली. एरवी या नदीत पाणी नसते. या नदीला शासनाने कालव्याचा दर्जा दिला असल्यामुळे सध्या उजनीमध्ये जादा झालेले पाणी कालव्यातून सोडले जात आहे. या पाण्यामुळे कालवा लाभक्षेत्रातील पिकांना जीवदान मिळाले आहे.

परंतू अशा परिस्थितीत नदीत पाणी सोडण्याबाबत अद्यापही प्रशासनाने निर्णय नघेतल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील उभी पिके जळत आहेत. नदीकाठची गुंजेगाव, तनाळी, तावशी, मारापुर, सिद्धेवाडी, घरनिकी, ढवळस, या गावातील शेतीच्या पाण्याबरोबर पिण्याच्या पाणीपुरवठ्यावर देखील मोठा परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितीन नागणे यांनी या नदीत पाणी सोडावे अशी मागणी केली होती. परंतु या मागणीकडे देखील प्रशासनाने सोयिस्कररित्या दुर्लक्ष केले आहे. परंतु या दुष्काळामुळे या भागातील ऊस शेती जळून या भागातील शेतकरी देशोधडीला लागणार आहेत. त्याचे उजाड माळरानात रुपांतर होण्यास वेळ लागणार नाही.

"शासनाने वाया जाणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन करून माण नदीपात्रामध्ये पाणी सोडल्यास हजारो शेतकरी उद्ध्वस्त होण्यापासून वाचतील. नाहीतर येणाऱ्या काळामध्ये येथील शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक समस्यांना सामना करावा लागेल. शासनाने योग्य वेळी योग्य नियोजन करून शेतकऱ्यांना सन्मान देण्याची गरज आहे."
 - हरिभाऊ यादव( मारापुर) शेतकरी

                           

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

Prajwal Revanna : 'प्रज्वल' प्रकरणामुळे प्रचाराची दिशाच बदलली; काँग्रेस आक्रमक, JDS ऐवजी भाजप नेते रडारवर

Parveen Shaikh: इस्रायल-हमास युद्धावर पोस्ट केल्याने प्रिन्सिपलवर नोकरी गमावण्याची वेळ

Latest Marathi News Live Update : १५ जूनपर्यंत मालमत्ता कर भरल्यास मिळणार १०% सूट

SCROLL FOR NEXT