pla.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

सोलापूर : घट विसर्जनानंतर तलावात हजारो प्लास्टिक कॅरिबॅग 

परशुराम कोकणे

सोलापूर : नऊ दिवस देवीच्या नावाने पूजा केल्या जाणाऱ्या घटांचे प्लास्टिक कॅरिबॅगत घालून संभाजी तलावातील पाण्यात विसर्जन केले जात आहे. हे चित्र दरवर्षीचेच असून, यामुळे संभाजी तलावाच्या प्रदूषणात वाढ होत आहे.

गणेश विसर्जनप्रमाणे घटांच्या विसर्जनासाठी, प्लास्टिक कॅरिबॅग संकलनासाठी संभाजी तलाव परिसरात महापालिकेने स्वतंत्र व्यवस्था करावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमींतून होत आहे. 

मातीच्या घटांमुळे पाण्याचे प्रदूषण होत नसले तरी घटांसोबत येणाऱ्या प्लास्टिक कॅरिबॅग आणि अन्य कचऱ्याचे काय? तलावाच्या ठिकाणी घटांपेक्षा प्लास्टिक कॅरिबॅग जास्त आहेत. गणेश विसर्जनावेळी महापालिकेकडून विर्सजन कुंड आणि निर्माल्य संकलनासाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाते. तशी वेगळी व्यवस्था घटांच्या विसर्जनावेळी करणे गरजेचे आहे.

दरम्यान, देवीच्या नावाने पूजा केलेल्या घटांचे प्रदूषित पाण्यात विसर्जन करण्यापेक्षा, घराच्या बागेतही घटांचे विर्सजन करता येऊ शकते, असे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे. सोलापूरकरांना जलाशये प्रदूषित करायची सवय लागली आहे. आपले घर स्वच्छ ठेवायचे आणि सार्वजनिक ठिकाणी घाण करायचे प्रकार वाढले आहेत. या प्रबोधनासोबत कडक कारवाई आवश्‍यक आहे. 
- राजश्री सुतार, चित्रकार 

आता हिंदूसह सर्व धर्मातील नागरिकांनी आपला देव आपल्या उंबऱ्याच्या आत ठेवावा. आपल्या सण-उत्सवाकरिता जलाशये किंवा कोणतेही सार्वजनिक ठिकाण प्रदूषण करण्याचा आपल्याला अधिकार नाही. 
- सुभाष बडवे, पर्यावरणप्रेमी 
 

आम्ही गणेश विसर्जनाप्रमाणे देवीचे घटही घराच्या बागेतच विसर्जित करतो. घटांची माती झाडांना घालता येते किंवा मग घटात वाढलेली धन्याची रोप बागेत लावून मोठी करता येतात. स्मार्ट सिटी होत असताना आपण सर्वांनी बदलायला हवे. 
- मनोज बिडकर, प्राचार्य, आयटीआय 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price Today: आठवड्याच्या सुरुवातीलाच सोनं स्वस्त! उच्चांकापासून ₹31,000 खाली; ऑक्टोबरमध्येही घसरण कायम, ताजा भाव किती?

Tiger Death: जंगलातून शेतापर्यंत वाघांचा पाठलाग; झुंजीत नर वाघाचा मृत्यू झाल्याचा वनविभागाचा अंदाज

Ramdas Athawale: बारा वर्षांनंतरही सत्तेत योग्य वाटा नाही; रिपाइं आठवले गटाला संधीची प्रतीक्षा, कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर

Latest Marathi News Live Update : एकनाथ शिंदे पुन्हा दिल्ली दौऱ्यावर जाणार? अमित शाह यांची भेट घेण्याची शक्यता

Success Story: सकाळी ५ वाजता ग्राउंड अन् रात्रीपर्यंत अभ्यास; वैशालीने जिद्दीने मिळवली कारागृह पोलिसाची वर्दी, शेतकरी कुटुंबातील लेकीची प्रेरणादायी भरारी..

SCROLL FOR NEXT