Three arrested with WhatsApp admin 
पश्चिम महाराष्ट्र

"ऍडमिन'सह तिघे बाराच्या भावात, फेक मेसेज फिरवला

सकाळ वृत्तसेवा

पारनेर ः सोशल मीडियावरून कोरोनाविषयाची खोटी माहिती पसरविल्याच्या आरोपावरून नांदूर पठार व पिंपळगाव रोठा येथील सोशल मीडियावरील एका ग्रुपच्या "ऍडमिन'सह तीन जणांना पारनेर पोलिसांनी अटक केली. हवालदार भालचंद्र दिवटे यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

"कोरोनाची लागण झालेली एक व्यक्ती गारगुंडी, अक्कलवाडी, वडगाव दर्या, पिंपळगाव रोठा परिसरात फिरत आहे. तो जवळ येऊन बोलतो, मला पाणी द्या किंवा आजची रात्र तुमच्याकडे मुक्काम करू द्या, असे म्हणतो, अंगावर थुंकतो. तरी सावध व सतर्क राहा,' असा मेसेज नांदूर पठार येथील दत्ता भाऊ फ्रेंड सर्कल या व्हॉट्‌सऍप ग्रुपवर रविवारी (ता. पाच) टाकण्यात आला होता. त्यामुळे जनतेत भीती पसरविल्याबद्दल, तसेच अफवा पसरविली म्हणून हा मेसेज टाकणारे मनोज जगताप (रा. पिंपळगाव रोठा), किरण बोंटे व ग्रुप ऍडमिन दत्तात्रय आग्रे (दोघे रा. नांदूर पठार) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना पोलिसांनी अटकही केली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2400 crore loss: आयपीएलला प्रत्येक वर्षाला २४०० कोटींचा फटका बसतोय, पण कसा? मोदीने गणित समजावून सांगितलं

Arshdeep Singh Girlfriend: अर्शदीप सिंगची गर्लफ्रेंड आहे 'ही' अभिनेत्री? एका टॅटूमुळे समोर आलं मिस्ट्री गर्लचं रहस्य, Viral Post

‘लाडकी विद्यार्थिनी’ योजना रखडली, दीड हजार मुलींचे भवितव्य नावाच्या वादात

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर जिल्ह्यातील साबळेवाडी, शिंदेवाडी, खुपिरे परिसरात २४ शेतकऱ्यांच्या शेतीपंपांच्या केबलची चोरी

कतरिनाच्या गाण्यावर गौतमीचा भन्नाट डान्स, एन्ट्री स्टेप पाहून नेटकरी थक्क, Viral Video

SCROLL FOR NEXT