Three New Ministers Welcome In Kolhapur Kolhapre Marathi News
Three New Ministers Welcome In Kolhapur Kolhapre Marathi News 
पश्चिम महाराष्ट्र

आणि ऋतुराज पाटील यांनी धरला ठेका...

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : ढोल-ताशे, बॅंजोच्या दणदणाटात आणि जयघोषात राज्याचे कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री सतेज पाटील व राजेंद्र पाटील-यड्रावकर या तिन्ही मंत्र्यांचे कोल्हापुरात जंगी स्वागत करण्यात आले. ताराराणी चौकातून दुपारी बाराला मिरवणुकीला सुरवात झाली. त्यानंतर दसरा चौक येथे मिरवणुकीची सांगता करण्यात आली

दरम्यान, महापौर ॲड. सूरमंजिरी लाटकर यांनी या तिन्ही मंत्र्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेससह मित्रपक्षांच्या महाविकास आघाडीची सत्ता आहे. मंत्रिमंडळात हसन मुश्रीफ यांना कॅबिनेट, सतेज पाटील आणि राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना राज्यमंत्रीपदाची संधी मिळाली आहे. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसनेमध्येही आज उत्साहाचे वातावरण होते

कोल्हापूरात उत्साहाचे वातावरण
ताराराणी चौकापासून सुरू झालेल्या मिरवणुकीत जिल्ह्यातील तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उर्त्स्फुत सहभाग घेतला. चौकातच भव्य व्यासपीठ उभे केले होते. तिन्ही मंत्री कोल्हापूरात येण्यापूर्वी सकाळपासूनच कार्यकर्ते ताराराणी चौकात एकत्र येत होते. मंत्री आल्यानंतर जोरदार घोषणा बाजीसह फटाके फोडून त्यांचे स्वागत करण्यात आले. कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे तावडे हॉटेल ते ताराराणी चौक तसेच ताराराणी चौक ते मध्यवर्ती बसस्थानक रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह आपल्या नेत्यांच्या घोषणा देत कार्यकर्त्यांनी मिरवणुकीत सहभाग घेतला.

हेही वाचा - धक्कादायक : १६ वर्षांत ९ बिबट्यांचा मृत्यू

चौकात चौकात गर्दी
मिरवणूक मध्यवर्ती बसस्थानकाजवळ आल्यानंतर तिन्ही मंत्र्यांनी राजीव गांधी यांच्या पुतळ्या पुष्पहार अर्पण केले. त्यानंतर पुन्हा मिरवणूकीला सुरूवात झाली. काँग्रेस कमिटीसमोर जोरदार आतिषबाजी करण्यात आली. यावेळी, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील, आमदार राजू आवळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, उपाध्यक्ष सतीश पाटील, आर. के. पोवार, शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार, विजय देवणे, संध्या घोटणे आदी उपस्थित होते

मंत्र्यांच्या स्वागताला दुमदुमले शहर
मंत्र्यांच्या मिरवणुकीत ढोल-ताशांवर ठेका धरलेल्या कार्यकर्त्यांनी आमदार ऋतुराज पाटील यांनाही विनंती केली. कार्यकर्त्यांच्या विनंतीला मान देत ऋतुराज पाटील यांनीही ठेका धरत कार्यकर्त्यांबरोबर नृत्य करायला सुरवात केली. या वेळी, जोरदार घोषणाबाजी करीत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

धक्कादायक घटना! मुलीला बोटावर शस्त्रक्रियेसाठी नेले, डॉक्टरांनी चुकून केली जिभेवर शस्त्रक्रिया

बारावीचा 21 किंवा 22 मे रोजी तर दहावीचा निकाल 30 मेपूर्वी! ‘या’ संकेतस्थळांवर पाहता येईल निकाल; जुलैमध्ये अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा

Dahi Poha Recipe: सकाळच्या नाश्त्यात दही पोह्याचा घ्या आस्वाद ,जाणून घ्या रेसिपी

लोकसभा निवडणुकीत भाजप-एनडीए 400 जागा पार करणार; अंबाबाई दर्शनानंतर माजी मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

Corona Vaccine : कोरोना प्रतिबंधक ‘कोवॅक्सिन’चेही दुष्परिणाम; बनारस हिंदू विद्यापीठातील चाचण्यांमधील निरीक्षणे

SCROLL FOR NEXT