new ministers welcome ceremony in kolhapur.gif
new ministers welcome ceremony in kolhapur.gif

यड्रावकर भारी अन्‌ सतेज पाटील त्याहूनही भारी 

कोल्हापूर : थेट पाईप लाईन, शाहू जन्मस्थळ, महालक्ष्मी मंदिर विकास आराखड्यासह जिल्ह्यातील सर्व प्रश्‍न मार्गी लावणार असल्याची ग्वाही कॅबिनेमंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री सतेज पाटील आणि राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी आज दिली. राज्याच्या या तिनही मंत्र्यांचे कोल्हापूरात जल्लोषी स्वागत करण्यात आले. त्यानंतर, दसरा चौक येथे आयोजित कार्यक़्रमात ते बोलत होते.

हे पण वाचा - भल्या पहाटेच चार जणांवर काळाचा घाला, समोरून बस आली आणि...

आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, "" दोन महिन्यापूर्वी विधानसभेचा निकाल जाहीर झाला. आम्ही विरोधी पक्षाचे आमदार म्हणून मुंबईला गेला होतो. आज येताना सत्तेतील मंत्री म्हणून कोल्हापूरात आलो. हा काळाचा महिमा आहे. भाजपची सत्ता गेली पाहिजे, हेच जनतेच्या आणि नियतिच्या मनात होते. शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस महाविकास आघाडीची सत्ता आली पाहिजे, हेच लोकांच्या मनातही होते. शेतकरी कर्जमाफी आणि शिवथाळीबाबतही सरकारने चांगला निर्णय घेतला आहे. जिल्ह्याचे प्रलंबित प्रश्‍न आहेत. अंबाबाई तीर्थक्षेत्र आराखडा पूर्ण झालेला नाही. शहराला निधी आला नाही. थेट पाईप लाईंन थांबली आहे. पूरग्रस्तांनाही निधी मिळालेला नाही, या सर्व प्रश्‍नावर निर्णय घेतले जातील. लोकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या जातील.

हे पण वाचा -खासदारांच्या समोरच महिलांनी घेतल्या नदीत उड्या, अन्... (video)

राज्यमंत्री सतेज पाटील म्हणाले, "" मंत्री मंडळाच्या शपथविधीनंतर तात्काळ कोल्हापूरला येणार होतो. मात्र जिल्हा परिषदेची राहिलेली विकेट घ्यायची होती. त्यामुळे माझ्यासह श्री मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक यांनी ठरवल की, ही विकेट घेतल्यानंतरच कोल्हापुरात जायचे. त्यानुसार जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीच्या माध्यमातून दणदणीत यश मिळाले आहे. बदलत्या राजकारणात 41 वर्षे ज्या माणसाने कॉंग्रेसच्या तालुका अध्यक्ष म्हणून धुरा सांभाळली. त्या बजरंग पाटील यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद देण्याची संधी मिळाली. तसेच राष्ट्रवादीच्या सतीश पाटील यांनी जोडण्या लावल्या त्यांना उपाध्यक्षपदाची संधी मिळाली.'' मंत्री पदाच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रश्‍न सोडविण्याची जबाबदार तिघांची असल्याचेही श्री पाटील यांनी सांगितेल.

हे पण वाचा -...तर मुख्यमंत्र्यांच्या चिंता वाढतील

राजेंद्र पाटील-यड्रावकर म्हणाले, "" जिल्ह्यातील प्रत्येक विकास कामामध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनातून सहभाग घेतला जाईल. कोणतेही काम अपूर्ण ठेवले जाणार नाही. जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्‍न तात्काळ सोडविण्यासाठी तिन ही मंत्री पुढाकार घेतली.''

महापौर सुरमंजिरी लाटकर, उपमहापौर संजय मोहिते, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील, आमदार राजू आवळे, संजय पाटील उपस्थित होते.

सोळांकूरमध्ये थेट पाईपलाईन अडकली
राज्यमंत्री सतेज पाटील यांनी आपल्या भाषणाची सुरूवात केली. उपस्थित सर्वांचीच नावे त्यांनी घेतली. ए. वाय. पाटील यांचेही नाव घेतले पण व्यासपीठावरील एका कार्यकर्त्यांनी ए. वाय. पाटील यांचे नाव राहिले, असे सांगता. सतेज पाटील यांनी मिश्‍किलपणे म्हणाले, आमची थेट पाईप लाईन सोळांकूरमध्ये अडकली आहे. त्यामुळे ए. वाय. पाटील यांचे नाव चुकवून कसे चालेल. असे म्हणताच एकच हशा पिकला.

यड्रावकर भारी अन्‌ सतेज पाटील त्याहूनही भारी 
राजेंद्र पाटील-यड्रावकर शांत राहून मंत्रीपद मिळवले. एखाद्या गोष्टीचे लक्ष कसे करायचे हे यड्रावकरांकडून शिकले पाहिजे. चेहऱ्यावर दिसतात त्यावर तुम्ही जावू नका, असा सल्ला देत सतेज पाटील तर यड्रावरकरांपेक्षाही फास्ट असल्याचे मुश्रीफ यांनी सांगताच कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा वर्षाव केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com