पश्चिम महाराष्ट्र

आता गावे होणार टकाटक ; आजपासून "स्वच्छता ही सेवा' उपक्रम

सकाळ वृत्तसेवा

सातारा : महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीच्या अनुषंगाने देशात स्वच्छता ही सेवा हा उपक्रम राबवण्यात येत आहे. यामध्ये प्राधान्याने प्लॅस्टिक कचरा संकलन व व्यवस्थापन ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेमार्फत उद्या (ता. दोन) जिल्ह्यामध्ये प्लॅस्टिक कचऱ्याचे संकलन करण्यात येणार असल्याने गावे टकाटक होणार आहेत. 
प्लॅस्टिकचा अनिर्बंध वापर व व्यवस्थापनाचा अभाव यामुळे जमीन, पाणी, पर्यावरण, हवा यांचे प्रदूषण होत आहे. यामुळे अनेक गंभीर समस्या निर्माण होत आहेत. यासाठी गावांतील ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, युवक मंडळे, महिला बचत गट, भजनी मंडळे, शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजना, नेहरू युवा केंद्रे, राष्ट्रीय छात्र सेना, जिल्हा, तालुका व ग्रामपंचायत स्तरावरील शासनाचा सर्व अधिकारी, कर्मचारी वर्ग, सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांमार्फत महाश्रमदान केले जाईल. सर्व ग्रामपंचायतींमध्ये एकत्रित प्रयत्नातून प्लॅस्टिक संकलन उपक्रम राबविला जाणार आहे. 

जिल्हा परिषदेमार्फत प्लॅस्टिक संकलन उपक्रमाची जनजागृतीही केली जात आहे. या उपक्रमाची माहिती जिल्हा परिषदेच्या jalshaktisatara@gmail.com या ई-मेलवर पाठविण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना श्री. भागवत यांनी दिले आहेत. यामध्ये उपक्रमांचे ठिकाण, उपस्थित लोक, किती नागरिकांचा सहभाग, किती किलो प्लॅस्टिक जमा झाले व किती तास श्रमदान झाले व उपक्रमांची छायाचित्रे पाठवावी लागणार आहेत. त्यामुळे जिल्हाभरात किती टन प्लॅस्टिक संकलित झाले, याची माहितीही उपलब्ध होणार आहे. 
 


प्लॅस्टिकचा पुनर्वापर 

गावातील संपूर्ण प्लॅस्टिक कचरा संकलित करेपर्यंत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. प्लॅस्टिक संकलनानंतर एकत्रित झालेला प्लॅस्टिक कचरा पुनर्चक्रणाकरिता प्लॅस्टिक पुनर्चक्रण करणाऱ्या उद्योजकांना देण्यात येणार आहे. गावात पूर्ण स्वच्छता होईपर्यंत हा उपक्रम राबविण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांनी दिल्या आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा कहर! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन; दिला सतर्कतेचा इशारा

Nagpur Vidhan Bhavan Project: नागपूर विधानभवनाचे रूपडे पालटणार; १,००० कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प, दोन्ही सभागृह येणार एकाच छताखाली

Latest Marathi Live Update : लोणावळ्या कडे जाणाऱ्या रोडवर दरड कोसळली, कातळ धबधबा शेजारची घटना

Maharashtra Rain: पालघरमध्ये मुसळधार! 24 तासांत 134 मिमी पाऊस, जनजीवन विस्कळीत; वाहतूक ठप्प

Navi Mumbai: बटाटावड्यात आढळली अळी, नवी मुंबई महापालिकेच्या भोजनालयातील प्रकार

SCROLL FOR NEXT