Siddhewadi Miraj ZP school first standard admission

 

esakal

पश्चिम महाराष्ट्र

सिद्धेवाडीच्या जिल्हा परिषद शाळेत ६० विद्यार्थ्यांनी घेतला प्रवेश; चिमुकल्यांची बैलगाडीतून संपूर्ण गावातून काढली मिरवणूक

तब्बल ६० विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्चित केला.

सकाळ डिजिटल टीम

-ज्ञानदेव मासाळ

सांगली : सिद्धेवाडी (ता. मिरज) येथील जिल्हा परिषद शाळेत गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर इयत्ता पहिलीतील नवीन विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेला उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. शिक्षणाच्या या नव्या प्रवासाची गोड सुरुवात अधिक संस्मरणीय करण्यासाठी गावातील पालकांनी अनोख्या पारंपारिक पद्धतीचा अवलंब केला.

नवीन प्रवेश घेतलेल्या चिमुकल्यांची बैलगाडीतून संपूर्ण गावातून धनगरी ढोल, कैताळ, हलगी, ताशा अशा पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. फुलांनी सजवलेल्या बैलगाडीत बसलेल्या निरागस चेहऱ्यांवर आनंद आणि कुतूहलाचे भाव खुलून दिसत होते. ग्रामस्थांनीही उत्स्फूर्त सहभाग घेत विद्यार्थ्यांवर फुलांचा वर्षाव करत त्यांचे स्वागत केले. तब्बल ६० विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्चित केला.

मिरज पंचायत समितीच्या सभापती श्रीमती. तन्वी कमलेकर, जिल्हा परिषद सदस्य आशिष जाधव, सरपंच सौ. उज्वला धडस, मुख्याध्यापक श्री. शिवाजी ऐवळे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रवी खताळ यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. सांगली जिल्हा परिषदेच्या वतीने आज सर्व पालकांना जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेण्याबाबत प्रबोधन व आहे. शिक्षणाच्या दिशेने टाकलेले हे पहिले पाऊल गावासाठी अभिमानास्पद ठरत असून, या उपक्रमातून शिक्षणाबाबत जागरूकता आणि सकारात्मक संदेश दिला गेला. आजच्या घडीला अनेक पालकांचा इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे ओढा असतानाही सिद्धेवाडी परिसरातील पालकांनी या प्रवाहाला फाटा देत आपल्या गावातील शाळेवर विश्वास दाखवत मुलांचे प्रवेश घेतले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

माशी शिंकली…! IPL 2026 ला सुरुवात होण्यापूर्वीच CSK च्या स्टार खेळाडूने माघार घेतली, दुखापतीमुळे संपूर्ण हंगामाला मुकणार

Mokhada News : थायलंडच्या सफेद जांभळाची चव आता मोखाड्यात... उच्च शिक्षित डॉ. सुमित ढाक या तरुणाचा अभिनव शेती प्रकल्प.

Latest Marathi News Live Update : नाशिकच्या मनसैनिकांचे फलक चर्चेत

Phulambri News : फुलंब्रीत गोवंश कत्तलीचा मोठा पर्दाफाश...पोलिसांचा छापा; आठ जनावरे जिवंत ताब्यात

Gold Rate Update : गुढीपाडव्याला महाराष्ट्रात सोनं कोसळलं! 2 महिन्यांतील सर्वात स्वस्त भाव आज; 1 तोळा कितीला विकलं जात आहे?

SCROLL FOR NEXT