Solapur
Solapur 
पश्चिम महाराष्ट्र

Loksabha 2019 : सोलापुरात शरीर काँग्रेसबरोबर तर मन जातीबरोबर

विजयकुमार सोनवणे

सोलापूर : उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी उपस्थित झालेल्या कार्यकर्त्यांची गर्दी पाहिल्यावर काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्यासह त्यांच्या समर्थकांमध्ये खुशी की लहेर पसरली. मात्र राजकारणातील बदलल्या समीकरणांमुळे मतदानाच्या दिवसांपर्यंत अनेक घडामोडी होण्याची शक्यता आहे. कुणी कितीही दावा केला तरी, कांग्रेसमधील अनेकांचे शरीर काँग्रेसबरोबर तर मन जातीकडे ओढल्याचे दिसून येत आहे. स्वकीयांचा हाच गनिमा कावा शिंदेंना य़शापासून दूर नेण्याची शक्यता आहे.

भाजपचे उमेदवार डॅा. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी शक्तीप्रदर्शन न करता उमदेवारी दाखल केली. मात्र वंचीत बहुजन आघाडीचे ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या पदयात्रेतील कार्यकर्त्यांची गर्दी पाहून काँग्रेसच नव्हे तर भाजपच्या गोटातही चिंता निर्माण झाली आहे. महास्वामी आणि आंबेडकर यांनी आपल्या लढतीमध्ये शिंदे यांना धरलेच नाही. या दोघांची वक्तव्ये पाहता, खरेच काँग्रेसला इतकी वाईट अवस्था आली आहे का, याचे आत्मचिंतन करण्याची वेळ काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर आली आहे. 

सोलापूर शहर उत्तर, दक्षिण व अक्कलकोटमध्ये लिंगायत समाजाचे प्राबल्य आहे. शहर मध्यमध्ये मुस्लीम आणि पद्मशाली, मोहोळ-पंढरपूरमध्ये मराठा, धनगर, ब्राह्मण समाजाचे प्राबल्य आहे. या सर्व मतदारसंघामध्ये दलित समाजाचे ठराविक मतदान आहे. बहुतांशवेळा काँग्रेसच्या बाजूने असणारे दलितांचे मतदान यंदा वंचित आघाडीमुळे विभागले जाणार आहे. लिंगायत समाजाचे नेते काँग्रेसमध्ये पदाधिकारी असले तरी त्यांचे नेतृत्व मानणारे किती मतदार लिंगायत समाजात आता राहतील हा संशोधनाचा विषय असणार आहे. मुस्लीम समाजातील बहुतांश मतदारही वंचितकडे जाण्याची शक्यता आहे. भावनात्मक आवाहन सुरु झाल्याने भाजप व बसपच्या काही दलितवर्गीय नगरसेवकांनी ऍड. आंबेडकर यांना उघडपणे पाठिंबा दर्शविला आहे.

त्यामुळे पर्याय म्हणून काँग्रेसला मिळणारी ही मतेही विभागली जाणार आहेत. भाजप आणि वंचितमध्ये दलित आणि मुस्लीम मतांच्या विभागणीचा फायदा घेऊन विजयश्री मिळवण्याची चांगली संधी काँग्रेसला आहे, मात्र गरज आहे ती स्वकियांनी प्रामाणिकपणे काम करण्याची. गेल्या निवडणुकीत मतदानाच्या चिठ्ठ्याही मतदारांपर्यंत पोचल्या नव्हत्या ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे प्रत्येक नेत्यांना, कार्यकर्त्यांच्या बैठकीत फाजील आत्मविश्वास नको असे म्हणण्याची वेळ आली आहे. 

वाले, चाकोते, म्हेत्रेंची अग्निपरिक्षा
डॅा. जयसिद्धेश्वरांच्या उमेदवारीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले, माजी आमदार विश्वनाथ चाकोते आणि अक्कलकोटचे आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांची अग्निपरिक्षा असणार आहे. आपल्या मतदारसंघामध्ये काँग्रेसला जास्तीत जास्त मताधिक्क्य मिळवून देण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असेल. या मतदारसंघात झालेल्या मतदानावरच विधानसभा  निवडणुकीतील समीकरणे निश्चित होणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Saving Plan : दिवसाला फक्त २५० रुपये सेव्हिंग करा अन् २४ लाख रुपये मिळवा; लखपती बनवणारी सरकारी स्कीम

MI vs KKR IPL 2024 : IPL मधून मुंबई इंडियन्सचा पत्ता कट होणे टीम इंडियासाठी ठरणार गोड बातमी? जाणून घ्या कारण

Pension Department: पेन्शनधारकांना सरकारची मोठी भेट! नवीन ऑनलाइन पोर्टल केले लाँच; मिळणार 'या' सुविधा

Latest Marathi News Live Update: राहुल गांधींना 'शेहजादा' म्हणणाऱ्या पंतप्रधान मोदींवर प्रियंका गांधींचा हल्लाबोल

Indian Navy : अरबी समुद्रात पुन्हा भारतीय नौदलाची हवा, 20 पाकिस्तानींसाठी ठरले देवदूत

SCROLL FOR NEXT