Pune Bangalore Highway esakal
पश्चिम महाराष्ट्र

पुणे-बंगळूर महामार्गावरील वाहतूक मंद गतीने; निपाणीतील मांगुर फाट्यावरची काय स्थिती? पोलिस घटनास्थळी दाखल

सकाळच्या सत्रात प्रशासनाने काही काळ दुचाकी वाहनांना प्रवेश बंदी केली होती.

राजेंद्र हजारे

कोकण फाटा आणि या परिसरात पाऊस वाढल्यास कोल्हापूरहून बेळगावकडे होणाऱ्या वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

निपाणी : शहर आणि परिसरात चार दिवसापासून पडणाऱ्या दमदार पावसामुळे (Nipani Rain) तालुक्यातील अनेक गावांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. आज (ता. २६) सकाळपासूनच पावसाचा जोर वाढल्याने मांगुर फाट्यावर सेवा रस्त्यासह शेतीवाडीतील पाणी आल्याने दुचाकी स्वारांची तारांबळ उडाली.

शिवाय, महामार्गावरील (Pune Bangalore Highway) वाहतूक मंद गतीने सुरू होती. पावसाचे गांभीर्य ओळखून घटनास्थळी पोलीस प्रशासनासह महसूल विभागाचे अधिकारी पाण्यावर लक्ष ठेवून आहेत. गुरुवारी रात्रीपासून पडणाऱ्या पावसामुळे मांगुर फाटा (Mangur Phata) परिसरात शेतीवाडीतून पाण्याचे लोंढे वाहत आहेत.

Pune Bangalore Highway

त्यामुळे सतर्कता बाळगून पूर भागातील अधिकारी कर्मचारी थांबून आहेत. सौंदलगा हद्दीत मांगुर फाट्याजवळ कुंभार शेताजवळ महामार्गाला पर्याय म्हणून सुरू ठेवलेल्या सेवा रस्त्यावर वेदगंगेच्या नदीपात्रातील बॅक वॉटरचे पाणी आलेले नाही. कोकण फाटा आणि या परिसरात पाऊस वाढल्यास कोल्हापूरहून बेळगावकडे होणाऱ्या वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

सकाळच्या सत्रात प्रशासनाने काही काळ दुचाकी वाहनांना प्रवेश बंदी केली होती. पावसाचा जोर असाच राहिल्यास वेदगंगेच्या पाणी पातळीत वाढ होऊन बॅकवॉटरचे पाणी सेवा रस्त्यासह शेतीवाडी जाणार आहे. यावेळी मात्र प्रशासनाला एकेरी वाहतूक सुरू करावी लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain : मुंबईत शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, हवामान खात्याकडून २ दिवस रेड अलर्ट जारी; ४८ तास धोक्याचे

Petrol and Diesel: जीएसटी रिफॉर्म लागू झाल्यानंतर पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होणार? दिवाळीनंतर काय महाग होणार?

Latest Marathi News Live Updates : अंधेरी सबवे मागील तीन तासापासून वाहतुकीसाठी बंद

"मग त्याने एकट्यानेच आर्थिक बाजू का सांभाळावी" तेजश्री प्रधानने टोचले आजच्या तरुणींचे कान, म्हणाली...

Pune News : कोथरुड पोलिसांवर आरोप करणाऱ्या तीन तरुणींसह ५ जणांवर गुन्हा दाखल, मारहाण प्रकरणात नवा ट्विस्ट....

SCROLL FOR NEXT