Trama-Care-Center
Trama-Care-Center 
पश्चिम महाराष्ट्र

ट्रॉमा केअर वाचविण्याची गरज

सुधाकर काशिद

कोल्हापूर - दुर्घटनेच्या काळात छत्रपती प्रमिलाराजे इस्पितळ (सीपीआर) अनेकांच्या पाठीशी उभे राहते; पण आता सीपीआरच्या पाठीशीच करवीरवासीयांनी उभे राहण्याची वेळ आली आहे. कारण एखाद्या अपघातानंतर रुग्णांना मोठा आधार ठरणाऱ्या सीपीआरमधील ट्रॉमा केअर युनिटचे अस्तित्व काही महिन्यांपुरतेच उरले आहे. जर या युनिटला शासनाने बळ दिले नाही तर हे युनिट बंद पडणार हे निश्‍चित आहे. केवळ तीन वर्षांसाठी म्हणून या युनिटची उभारणी झाली होती. पण पुन्हा शासनाने बळ दिले तरच हा विभाग सुरू राहील.

ट्रॉमा केअर युनिटपुढे अपघातग्रस्तांना आधार मिळाला होता. या युनिटचे अत्याधुनिकीकरण एवढे होते, की मेंदूवरील किचकट शस्त्रक्रियाही येथे करता येत होत्या. अपघातानंतर एखाद्या खासगी रुग्णालयात जखमींना दाखल केले तर तेथील उपचारांच्या खर्चाची भीती छाती दडपून टाकणारी होती. या पार्श्‍वभूमीवर सीपीआर हे सर्वसामान्यांचे आधार ठरले आहे. केवळ दोनशे ते सव्वाशे रुपयात सीटी स्कॅन करता येते आहे. दारिद्यरेषेखालील कुटुंब व ज्येष्ठ नागरिकांना तर हे शुल्कही माफ आहे. त्यामुळे ट्रॉमा केअर युनिट कायम चालू राहणे आवश्‍यक आहे. काही प्रशासकीय तांत्रिक कारणास्तव तीन वर्षे झाली म्हणून ते बंद होणार असेल तर रुग्णांची फरफट होणार हे ठरले आहे.

सीपीआरमध्ये सीटी स्कॅन युनिट आहे. हे युनिट म्हणजे तर उपचाराचा मोठा आधार आहे. पण केवळ तांत्रिक कर्मचारी (टेक्‍निशियन) नसल्याने हे युनिट सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेपुरतेच ते सुरू असते अशी परिस्थिती आहे. सीपीआरमध्ये केवळ दोनशे ते सव्वादोनशे रुपयात सीटी स्कॅन  होते. पण सीपीआरमध्ये ही यंत्रणा ४ तासच सुरू असते. हे चार तास संपले की रुग्णांना खासगी संस्थेत धाव घ्यावी लागते. विशेष हे की सीटी स्कॅनचे निरीक्षण करणारी डॉक्‍टर मंडळी पुरेशा संख्येने आहेत. पण सीटी स्कॅन यंत्रणा चालवणारे टेक्‍निशयन दोनच असल्याने ही परिस्थिती उद्‌भवली आहे.

राजकीय नेत्यांनी मनात आणले तर ही यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होणे, ट्रॉमा केअर युनिट पूर्ववत चालू राहणे सहज शक्‍य आहे. पण सीपीआरच्या पाठीशी सर्व संघटना, सर्व राजकीय पक्ष, कार्यकर्ते, उभे राहिले तरी हे शक्‍य आहे.

ट्रॉमा केअर युनिट पूर्ववत पुढे चालू राहण्यासाठी प्रस्ताव पाठवला आहे. प्रस्तावाचा पाठपुरावाही चालू आहे. 
- डॉ. सुधीर नणंदकर, अधिष्ठाता, शाहू वैद्यकीय महाविद्यालय 

ट्रॉमा केअर सेंटर बंद होऊ देणार नाही. कारण अपघाताच्या घटनांत या ट्रॉमा केअरमुळे सर्व सामान्यांच्यावर यशस्वी उपचार झालेले आहेत. सामान्यांचा आधारवड असलेले हे सेंटर बंद होणार नाही. पुन्हा त्याचे नियमितीकरण होईल यासाठी मी लक्ष घालीन. 
- चंद्रकांत पाटील, पालकमंत्री

सीपीआर सर्वसामान्यांचा आधार आहे, पण त्याची किंमतच कोणाला नाही. दिग्विजय खानविलकर यांच्या निधनानंतर सीपीआरची हेळसांड सुरू झाली. मध्यंतरी बदल्यांचे राजकारण झाले व सीपीआर आणखी विस्कळीत झाले. आता ट्रॉमा केअर युनिट अंतिम श्‍वास घेत आहे; पण आम्ही ते बंद पडू देणार नाही.
- राजेश क्षीरसागर, आमदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

Auto-Brewery Syndrome : एक घोटही न पिता हा माणूस असतो टल्ली.. याचं शरीरच तयार करतं अल्कोहोल! जडलाय विचित्र आजार

Share Market Closing: शेअर बाजार किरकोळ वाढीसह बंद; पॉवर शेअर्स बनले 'सुपरस्टार'

SCROLL FOR NEXT