Auto-Brewery Syndrome : एक घोटही न पिता हा माणूस असतो टल्ली.. याचं शरीरच तयार करतं अल्कोहोल! जडलाय विचित्र आजार

बेल्जियममध्ये एका व्यक्तीला दारुच्या नशेत गाडी चालवण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. मात्र, आपण दारु प्यायलोच नसल्याचा दावा ही व्यक्ती वारंवार करत होती.
Auto-Brewery Syndrome
Auto-Brewery SyndromeeSakal

Belgian Man with Auto-Brewery Syndrome : दारु प्यायल्यानंतर लोकांना नशा चढते हे आपण पाहिलंच आहे. शरीरात अल्कोहोलचं प्रमाण वाढल्यामुळे हे होतं. मात्र, दारूचा एक घोटही न घेता जर एखाद्या व्यक्तीच्या शरीरातील अल्कोहोलचं प्रमाण वाढत असेल तर? बेल्जियममधील एका व्यक्तीसोबत असाच काहीसा प्रकार होत आहे. यामुळे ही व्यक्ती चक्क तुरुंगात जाता जाता राहिली आहे.

बेल्जियममध्ये एका व्यक्तीला दारुच्या नशेत गाडी चालवण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. मात्र, आपण दारु प्यायलोच नसल्याचा दावा ही व्यक्ती वारंवार करत होती. तपासणीमध्ये देखील हे स्पष्ट झालं की त्या व्यक्तीने दारू प्यायलेली नाही. त्यामुळे न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केली. पण मग त्या व्यक्तीच्या शरीरात अतिरिक्त अल्कोहोल आलं कुठून?

शरीरात आपोआप तयार होतं अल्कोहोल

न्यायालयात जेव्हा या प्रकरणाची सुनावणी सुरू होती; तेव्हा समजलं की या व्यक्तीच्या शरीरात आपोआप अल्कोहोल तयार होतं. त्याचे वकील अँसे गेस्क्वेअर यांनी कोर्टात सांगितलं, की या व्यक्तीला ऑटो-ब्रूअरी सिंड्रोम (Auto-Brewery Syndrome) हा आजार आहे. यामुळेच त्याच्या शरीरात आपोआप अल्कोहोल तयार होतं. या दाव्याची तीन वेगवेगळ्या वैद्यकीय पथकांनी तपासणी केली; यानंतर हा दावा खरा असल्याचं सिद्ध झालं.

Auto-Brewery Syndrome
Love Brain Disorder : प्रेमात वेडी? तरुणीने बॉयफ्रेंडला एका दिवसात केले 100 हून अधिक फोन; डॉक्टर म्हणतात हा 'लव्ह ब्रेन' आजार

काय आहे हा आजार?

यथार्थ रुग्णालयातील गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट आणि हेपॅटोलॉजिस्ट डॉ. मनीष के. तोमर यांनी याबाबत अधिक माहिती दिली. त्यांनी सांगितलं, की ऑटो-ब्रूअरी सिंड्रोम हा एक दुर्मिळ आजार आहे. जगभरातील केवळ 20 लोकांनाच हा आजार आहे. हा आजार असणाऱ्या व्यक्तीच्या पोटात कार्बोहायड्रेट्सचं फर्मेंटेशन होत असतं. ज्यामुळे इथेनॉल तयार होते. हे इथेनॉल लहान आतड्यात शोषलं जातं. यामुळे पुढे रक्तात अल्कोहोलचं प्रमाण वाढतं आणि नशा होते.

ABS चा धोका कोणाला?

कोणत्याही वयोगटातील, किंवा लिंगाच्या लोकांना हा आजार होऊ शकतो. परंतु मधुमेह, लठ्ठपणा किंवा कमी रोगप्रतिकारक शक्ती किंवा आतड्यांचे आजार असलेल्या व्यक्तींना हा आजार होण्याची शक्यता जास्त असते.

ABS ची लक्षणे काय आहेत?

यामध्ये रक्तातील अल्कोहोलची पातळी वाढणे, ज्यामुळे अस्पष्ट बोलणे, गोंधळ होणे आणि त्वचा लाल होणे यांचा समावेश होतो. या स्थितीत असलेल्या व्यक्तींना पोट फुगणे, गोळा येणे आणि अतिसार यांसारखी लक्षणे देखील दिसू शकतात.

ABS वर उपाय काय?

नियमित आहारात योग्य बदल केल्याने हा धोका टाळला जाऊ शकतो. ज्यामध्ये कर्बोदके आणि शर्करायुक्त पदार्थांचे सेवन कमी करणे याचा समावेश आहे.

Auto-Brewery Syndrome
Delusional Love Disorder : 'असं वाटतं कॉलेजमधील सगळ्या मुली माझ्या प्रेमात..', तरुणाला झाला विचित्र आजार; डॉक्टर म्हणतात..

ABS चा धोका कमी करण्यासाठी प्रोबायोटिक्स / अँटीफंगल औषधे देखील दिली जातात. कारण त्यांच्या असंतुलनामुळे इथेनॉलचे प्रमाण वाढू शकते. तरीही, काही प्रतिजैविके देखील आहेत जी मोठ्या प्रमाणात काही विशिष्ट यीस्ट किंवा बॅक्टेरियांना लक्ष्य करतात. जे शरीरात अल्कोहोलच्या उत्पादनास कारणीभूत असतात. त्यामुळे मधुमेह किंवा इम्युनोडेफिशियन्सी डिसऑर्डर सारख्या ऑटो-ब्रुअरी सिंड्रोमच्या वाढीस कारणीभूत ठरणाऱ्या इतर कोणत्याही आरोग्य समस्येवर उपचार करणे आवश्यक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com