Transferred 1.90 crore in relatives account by tow employees of nationalized bank 
पश्चिम महाराष्ट्र

शेतकऱ्यांचे 1.90 कोटी नातेवाईकांच्या खात्यावर वर्ग; राष्ट्रीयीकृत बॅंकेत अपहार, दोन कर्मचाऱ्यांवर गुन्हे 

शैलेश पेटकर

सांगली : शहरातील एका राष्ट्रीयीकृत बॅंकेच्या शाखेत 1 कोटी 90 लाख रुपयांचा अपहार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी बॅंकेतील राहुल बनसोडे (रा. महादेवनगर, इस्लामपूर) आणि अलोक व्हिक्‍टर झेस (रा. जरीपटका नागपूर,

सध्या रा. राजयोग अपार्टमेंट, राममंदिर कॉर्नर) या दोघांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. बॅंकेचे वरिष्ठ अधिकारी कारगल शंकरभट्ट उद्या (वय 57, रा. सोलापूर) यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित बनसोडे आणि झेस हे दोघेही एका राष्ट्रीयीकृत बॅंकेतील सांगली शाखेत कर्मचारी आहेत. आटपाडी येथील सद्‌गुरू सहकारी साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांच्या नावे एचएनटी रक्कम आहे. ती रक्कम त्यांनी संबंधित कारखान्याकडे वर्ग करणे आवश्‍यक होते.

बनसोडे आणि झेस या दोघांनी संगनमत करून नातेवाईक, हितचिंतक व अन्य लोकांच्या नावाने बॅंक खाते तयार करून, त्या खात्यांमध्ये रक्कम वर्ग केली. ही रक्कम 1 कोटी 90 लाख रुपये इतकी होती. 26 ऑगस्ट 2019 ते 15 ऑक्‍टोबर 2020 या काळात राममंदिर चौकातील राष्ट्रीयीकृत बॅंकेत हा प्रकार घडला. 

दरम्यान शेतकरी, ऊस तोडकरी, ऊस टोळी करणाऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत. याबाबत चौकशी झाल्यानंतर हे पैसे दुसऱ्यांच्या नावावर वर्ग केल्याचा प्रकार निदर्शनास आला. फिर्यादीनुसार पोलिसांनी राहुल बनसोडे आणि अलोक झेस या दोघांविरुद्ध फसवणुकीसह विविध कलमांन्वये गुन्हे दाखल केले आहेत. शहर पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक एस. के. भंडारे, सुशांत ठोंबरे यांनी प्राथमिक चौकशी आणि तपास केला. 

संपादन : युवराज यादव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates : हिंदीविरोधातील स्टॅलिन यांच्या लढ्याला आमच्या शुभेच्छा - संजय राऊत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT