this treatment is usefull for Humani ali 
पश्चिम महाराष्ट्र

हा सापळा हुमणी किडीवर नियंत्रणासाठी ठरतोय उपयुक्त

सकाळवृत्तसेवा

लेंगरे (जि. सांगली ) : हुमणी नियंत्रणासाठी कृषी विभागाकडून प्रचार, प्रसिद्धीसाठी ठोस पावली उचलली जात आहे. यातील उपाय म्हणून एरंडाचे आमिष सापळे प्रायोगिक तत्त्वावर वापर करण्यासाठी प्रोत्साहान दिले जात आहे. या सापळ्याचा वापर कसे करावे याची कार्यशाळा परिसरातील काही गावांमध्ये कृषी विभागाकडून घेण्यात काम सुरू आहे. त्यामुळे शेतीकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. 

परिसरात दिवसेंदिवस बागायती क्षेत्रात वाढ होत आहे. गेल्या दोन-तीन वर्षांत ऊस क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. सुमारे साडेतीन हजार हेक्‍टर क्षेत्रावर ऊस लागवड करण्यात आली आहे. मात्र उसाची उत्पादकता तेवढी चांगली वाढलेली नाही. त्यामागे बरीच कारणे असून यामध्ये हुमणी कीड-रोगांचा प्रादुर्भाव हे मुख्य कारण आहे.

उसावरील किडीमध्ये प्रामुख्याने जास्त हानिकारक हुमणी कीड आहे. या हानीकारक किडीमुळे उसाच्या शेतीची पूर्ण क्षेत्र नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. ते रोखण्यासाठी एरंडी आमिष सापळ्याचे मिश्रण तयार करण्यासाठी एरंडीचे चूर्ण चार लिटर पाण्यात घालून त्यात दोन ग्लास ताक घालून हे मिश्रण 48 ते 72 तास आंबवण्यासाठी ठेवावे.

त्यानंतर हे आंबवलेले मिश्रण घेऊन चार ते पाच मडक्‍यात अथवा पसरट भांड्यात जमिनीखाली पुरून ठेवावे. दोन ते तीन ग्लास पाणी मिश्रण करून याप्रमाणे वापर ह्या जमिनीमध्ये ठेवलेल्या द्रावणाच्या वासामुळे भुंगे जमा होतात. हे जमा झालेले भुंगे मोठ्या पसरट भांड्यात रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून त्याचा नायनाट करता येणार आहे.

जमिनीत पुरलेल्या भांड्यावर लिंब, चिंच पानांची झावळ ठेवल्यास आणि प्रकाश सापळा लावून ठेवल्यास भुंग्यावर नियंत्रण मिळविण्यास यश आल्यानंतर हुमणीवर पूर्णपणे मिळवता येणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra TET Exam 2026 : राज्यात सव्वा दोन लाख शिक्षक देणार 'टीईटी'; २८ जूनला होणार परीक्षा, सहा लाख अर्जांची नोंदणी, अशी असेल केंद्रांची रचना

Monsoon Update : मॉन्सून रखडला! राज्यात आता 'या' तारखेनंतरच वाढणार पावसाचा जोर,हवामान विभागाचा नवा अंदाज जाहीर

TET Exam 2026: राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय! ‘टीईटी’साठी दुपट्टा, बुरखा घालण्यावर बंदी; गोंधळाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना

भयानक घटना! कॅनडाच्या खेळाडूचा पाय मोडला, वेदनेने कळवळला, रडला; स्ट्रेचरवरून सोडावे लागले मैदान; Video Viral

Latest Marathi News Live Update : केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा आज रात्री १० वाजता कोल्हापुरात येणार

SCROLL FOR NEXT