पश्चिम महाराष्ट्र

येळवडेतील अंगणवाडी सेविकेचं पोर झालं फौजदार

राजू पाटील

राशिवडे बुद्रुक - लग्नानंतर अवघ्या चार वर्षांतच आलेले वैधव्य आणि पोटाला दीड वर्षाचे चिमुकलं पोर, अशा परिस्थितीत तिने आयुष्याशी टक्कर दिली. खडतर प्रवासात अंगणवाडी सेविका म्हणून ती राबली. गावाची मुलं आपलेपणाने सांभाळणाऱ्या त्या माऊलीचं पोर आज फौजदार झालं. गेल्या २० वर्षांत घराला रंगही देऊ न शकणाऱ्या मातेच्या कौलारू घराला मुलानं सोन्याचं तोरण बांधलं. 

येळवडे (ता. राधानगरी) येथील श्रीमती सुवर्णा तानाजी सारंग व जिद्दी मुलगा तुषार यांच्या लढ्याची ही कथा. सुवर्णा सारंग यांचा येथील तानाजी सारंग यांच्याशी विवाह झाल्यानंतर अवघ्या चार वर्षांतच पतीने अर्ध्यावर साथ सोडली. पोटाला दीड वर्षाचा पोर आणि उभं आयुष्य हा फार मोठा प्रसंग. दाही दिशा कोसळल्या असतानाच त्यांना माहेर गंगापूर (ता. भुदरगड)च्यांनी आई-वडिलांसह भावांनी हात दिला. दीड वर्षाचं पोर संभाळायचं की बहिणीला आधार द्यायचा या परिस्थितीत त्यांनी बहिणीला अंगणवाडी सेविका केलं.  

पुन्हा चार वर्षांनंतर सुवर्णा येळवडे या आपल्या मूळ गावी आल्या. तिथे अंगणवाडी सेविका म्हणून रुजू झाल्या. गावच्या चिमुकल्या मुलांमध्येच आपलं विश्व केलं. गोरगरिबांच्या मुलांना पोटाशी धरून मायेचा हात फिरवला. त्याचवेळी तुषार आजोळी मामाकडे शिकत होता. प्रतिकूल परिस्थिती बापाचे छत्र हरवलेल्या आणि आईही दूर अशा परिस्थितीतून टक्कर देत त्यांने मामांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेतलं. आज हा तुषार प्रतिकूल परिस्थितीतून नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पोलिस उपनिरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. 

आई सुवर्णा आजही येळवडे येथील पतीच्या छोट्याशा मातीच्या घरात एकटीचा संसार थाटून आहे. हा प्रवास ती एकटीच गेली वीस वर्षे झाले चालतेय. आज तिच्या घराला पोटच्या पोरांने सोन्याचा तोरण बांधले’ शेणामातीचं तिचं घर ‘सुवर्ण किरणांनी’ उजळून निघालं आहे. आईची जिद्द उराशी बाळगून मुलांनेही जिद्दीला पेटून एवढं मोठं यश संपादीत  केलं. त्याबद्दल गावातून अनेक संस्था आणि युवक मंडळांकडून त्या मायलेकरांचा सत्कार होतोय. हा सोहळा पाहताना आई, चुलते, चुलत भाऊ भारावले आहेत.

आजोळचे पाठबळ
तुषारच्या यशात आजोळचे मामा बाळकृष्ण व संतोष ननावरे मामी मेघा आणि वर्षा यांच्यासह आजोबा दत्तात्रय व आजी मालूताई यांचे फार मोठे योगदान आहे. आपल्या पोटचं पोर असं समजून या कुटुंबाने डोळ्यात तेल घालून त्याचा सांभाळ केला. शिक्षणाची दिशा दाखवली आणि चुकीच्या वाटेवर पाऊल न पडता अगदी योग्य दिशा देऊन त्याला घडवण्यात या कुटुंबाचा फार मोठा हातभार आहे. त्यामुळे येळवडेसह गंगापूर येथेही त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : दुपारी तीन वाजेपर्यंत देशात 50.71 टक्के मतदान; महाराष्ट्र अजूनही सगळ्यात मागे

Fact Check : कोरोना लसीसंदर्भातील बातम्यांमुळे लस प्रमाणपत्रात बदल करण्यात आले नाहीत; व्हायरल होत असलेला दावा चुकीचा

जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश! चकमकीत लष्करचा प्रमुख बासित अहमद डारसह तीन दहशतवादी ठार

Kushal Badrike : "... ओळखीचे चेहरे अनोळख्या स्टेशनवर निघून जातात"; कुशलने व्यक्त केली खंत

Summer Home Decor Tips: उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा करुन घ्या फायदा; 'अशा' पद्धतीने करा घराचा मेकओव्हर.. सर्वजण पाहतच राहतील

SCROLL FOR NEXT