Tuti-Plant
Tuti-Plant 
पश्चिम महाराष्ट्र

तुतीची लागवड ७७३ एकरांवर

सकाळवृत्तसेवा

काशीळ - जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढल्याने दर वर्षी तुतीच्या क्षेत्रात वाढ होत आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण ७९५ शेतकऱ्यांनी ७७३ एकरांवर तुतीची लागवड केली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक सातारा तालुक्‍यात लागवड झाली असल्याची माहिती रेशीम कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

शेतीला पूरक उद्योग या दृष्टिकोनातून रेशीम शेती फायदेशीर ठरू लागली आहे. शेतकऱ्यांचा रेशीम शेतीकडे कल वाढावा, यासाठी गतवर्षी शासनाने महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत रेशीम शेती योजना कार्यान्वित केली होती. या योजनेस शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

सप्टेंबरअखेर या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ७९५ शेतकऱ्यांनी ७७३ एकरांवर तुतीची लागवड केली आहे. कऱ्हाड, सातारा, वाई, खंडाळा, फलटण, कोरेगाव, माण व खटाव या तालुक्‍यांतील शेतकऱ्यांचा यात समावेश आहे. २०१२-१३ मधील दुष्काळामुळे तुतीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घट झाली होती.

पाण्याअभावी अनेक शेतकऱ्यांना नाइलास्तव तुती काढून टाकावी लागली होती. त्यानंतर झालेल्या जलसंधाणाच्या कामातून पाण्याची उपलब्धता होऊ लागल्यावर वाई येथील रेशीम कार्यालयाने फायदेशीर रेशीम शेतीचा प्रसार आणि प्रचारावर भर दिला. यातून रेशीम शेती करण्याकडे तरुणांचा कल वाढला आहे. बाजारपेठ आणि चांगल्या दरासाठी प्रसिद्ध असेलल्या कर्नाटकातील रामनगर बाजारपेठ मिळाल्याने रेशीम शेती शाश्वत वाटत गेली. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कल वाढत गेल्याने क्षेत्रात वाढ होत गेली. माण, खटाव, फलटण, कोरेगाव, खंडाळा या दुष्काळी तालुक्‍यांसह सातारा व कऱ्हाड तालुक्‍यातील शेतकऱ्यांकडून रेशीम शेती केली जात आहे. जिल्हयात सर्वाधिक तुती लागवड सातारा तालुक्‍यातील १७६ शेतकऱ्यांनी १७५ एकर क्षेत्रावर केली आहे.

तालुकानिहाय तुतीचे लागवड क्षेत्र 
तालुका    शेतकरी    क्षेत्र (एकरमध्ये)

कऱ्हाड    १०३    ९९
सातारा    १७६    १७५
वाई    ५७    ५४
खंडाळा    ३२    ३२
खटाव    ५३    ४५
माण    १३४    १३१.५०
फलटण    ११०    १११.५०
कोरेगाव    १३०    १२५

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT