पश्चिम महाराष्ट्र

सेंद्रिय खतापासून अडीच एकर तंबाखू; अकराशे किलो उत्पादनाची अपेक्षा

तिसऱ्या आळणीसाठीही हीच पद्धत अवलंबली. एका महिन्यात सेंद्रीय खतांच्या आळवणी पूर्ण केल्या

विकास पाटील

जत्राट : रासायनिक खतांच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे आर्थिक फटका तर बसत आहेच, शिवाय आजारांचा फैलाव होतो. त्यासाठी बरेच शेतकरी सेंद्रिय शेतीला पसंती देत आहेत. येथे प्रगतशील शेतकरी विनायक बापूसाहेब पाटील यांनी २ एकर २० गुंठ्यांत सेंद्रिय खतापासून तंबाखूचे दर्जेदार उत्पादन घेतले आहे.

१२ आॅगस्टला पाटील यांनी तंबाखू लावण केली. त्यानंतर प्रत्येकी सहा दिवसाला मायरस व स्वाईल प्रो. या १५० लिटर सेंद्रिय खतांची पाण्यातून आळवणी केली. आठ दिवसानंतर दुसऱ्या आळवणीसाठी मेडिमय बुस्टर, मायरस, मॅग्नेशियम सल्फेटची १५० लिटरची आळवणी केली.

तिसऱ्या आळणीसाठीही हीच पद्धत अवलंबली. एका महिन्यात सेंद्रीय खतांच्या आळवणी पूर्ण केल्या. त्यानंतर प्रत्येक १५ दिवसाला कीड रोखण्यासाठी सेंद्रिय ह्युमिक अॅसिड, सेंद्रिय कार्बे, पोटॅशची फवारणी केली. पिकांच्या वाढीसाठी कॅल्शियम मॅग्नेशियम, सल्फरची फवारणी केली. पिकाला सूक्ष्म अन्नद्रव्ये मिळण्यासाठी सेंद्रिय पद्धतीने तयार केलेल्या झिंक, काॅपर, फेरस, बोराॅन, मॅग्नेशियम, मायरसची मात्रा दिली. तीन महिन्यांत पिकाची जोमात वाढ झाली. तंबाखू झाडाची उंची ४ फूट असून एका झाडाला १६ पाने आहेत. तंबाखूचा रंग गडद हिरवा दिसत आहे. कापणी करून त्याची वाळवणी केल्यास रंग, स्वाद, मिठ्ठास येऊन तंबाखूची पत्ती दर्जेदार निघते.

दृष्टिक्षेपात...

  • २ एकर २० गुंठे क्षेत्र

  • तीन महिन्यात ११ हजार खर्च

  • ११०० किलो तंबाखू उत्पादनाची अपेक्षा

"रासायनिक खतांच्या किमती वाढत आहेत. त्यामुळे सेंद्रिय खतांचा वापर करून शेती केल्यास फायदेशीर ठरणार आहे.सेंद्रिय खतामुळे उत्पादन वाढ होऊन पीक दर्जेदार येते. खर्चही कमी येतो."

- विनायक पाटील,

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local : लोकलने स्टेशन चुकवलं, प्लॅटफॉर्म सोडून २ किमी पुढे थांबली; गाडीतल्या प्रवाशांना रुळावर उतरण्याची वेळ, चूक कुणाची?

MPSC Exam : सोलापूरचा विजय लामकाने प्रथम; महिला प्रवर्गातून आरती जाधव प्रथम

Chhatrapati Sambhajinagar: व्यापाऱ्याचे दोन किलो सोने लंपास; गुजरातच्या तिघांविरोधात गुन्हा, सव्वातीन कोटींची फसवणूक

Silver Trader Death : सांगलीतील 24 वर्षीय चांदी व्यावसायिकाचा कोल्हापुरात संशयास्पद मृत्यू; चांदीच्या पार्सलमध्ये आढळलं तांबं, घटनेने मोठी खळबळ

Supreme Court: न्यायाधीशाला ‘विकण्याचा’ प्रयत्न, ३० लाखांच्या लाच प्रकरणात ७० वर्षीय वकिलाला सुप्रीम कोर्टाचा जबरदस्त धक्का!

SCROLL FOR NEXT