पश्चिम महाराष्ट्र

शिरवळनजीक अपघातात फलटणच्या दोघांचा मृत्यू 

सकाळवृत्तसेवा

खंडाळा - पुणे- बंगळूर महामार्गावर शिरवळ (ता. खंडाळा) येथे पंढरपूर फाट्यानजीक आज दुपारी साडेतीन वाजता भरधाव वेगात जाणाऱ्या कारने महामार्गालगत उभ्या असलेल्या टेंपोला पाठीमागून जोराची धडक दिली. त्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी व चालक किरकोळ जखमी झाला आहे. मृतांमध्ये फलटणचे नगरसेवक व माजी क्रीडा शिक्षकाचा समावेश आहे. मृतांना व जखमींना गाडीचा दरवाजा आणि काच फोडून बाहेर काढण्यात आले. 

पांडुरंग गोपाळ उर्फ पी. जी. शिंदे, (वय 78, रा. लक्ष्मीनगर, फलटण) व जगन्नाथ गणपत कुंभार (वय 65, रा. भडकमकरनगर, फलटण) अशी मृतांची नावे आहेत. आशिष नंदकुमार लोंढे (वय 40, रा. फलटण) (चालक) किरकोळ, तर अशोक आनंदराव देशमुख (वय 68, रा. बुधवार पेठ, फलटण) हे गंभीर जखमी असून, त्यांच्यावर पुण्यात उपचार सुरू आहेत. कुंभार हे फलटणचे राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक होते, तर शिंदे हे माजी क्रीडा शिक्षक व खो- खो असोसिएशनचे माजी कार्याध्यक्ष होते. देशमुख हे फलटणचे माजी नगराध्यक्ष आहेत. 

पोलिस व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे, कुंभार व अन्य जण पुण्याहून साताऱ्याकडे येत होते. दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास महामार्गावर महामार्गानजीक उभ्या असलेल्या टेंपोला (एमएच 04 सीजी 8038) कारने (एमएच 11 सीजी 9394) पाठीमागून जोरात धडक दिली. भरधाव वेगात असल्याने कारचा चक्काचूर झाला. अपघातात कारच्या पुढील बाजूस व मागे बसलेल्या अशा दोघांचा जागीच मृत्यू झाला. कारचे चालक आशिष लोंढे यांनी सीट बेल्ट लावला होता. त्यातच अपघात झाल्यानंतर कारमधील एअर बॅग उघडल्याने ते बचावले. त्यांच्या हाताला किरकोळ इजा झाली आहे. शिरवळमधील पंढरपूर फाट्यापासून 100 मीटर अंतरावर हा अपघात झाला. शवविच्छेदनानंतर सायंकाळी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वैवाहिक संबंध नाकारणे, मुलांची जबाबदारी न घेणे मानसिक क्रूरता; दिल्ली हायकोर्टाची टिप्पणी

Mahadev Betting App: महादेव बेटींग अ‍ॅप प्रकरणी आणखी एका अभिनेत्याला अटक

IPL 2024: ईशान किशनला BCCI चा दणका, दिल्ली-मुंबई सामन्यानंतर केली मोठी कारवाई

Antarctica Penguin : ग्लोबल वॉर्मिंगमुळे नष्ट होतायत अंटार्क्टिकावरील पेंग्विन; बर्फ वितळल्यामुळे लाखो नवजात पेंग्विन्सचा मृत्यू

Iraq: इराकमध्ये समलैंगिक संबंधाना गुन्हा ठरवणारा कायदा मंजूर; तब्बल इतक्या वर्षांचा होणार तुरुंगवास

SCROLL FOR NEXT