पश्चिम महाराष्ट्र

मामा- भाचेच्या टोळीतील दोघे पोलिसांच्या ताब्यात

सकाळवृत्तसेवा

सोलापूर : उस्मानाबाद, मुंबई व सोलापूर जिल्ह्यांत सहा गुन्ह्यातील संशयितांच्या टोळीचा सोलापूर पोलिसांनी शोध घेतला आहे. त्यातील चौघांपैकी दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून गॅस कटर, दोन गॅस टाक्‍या, 11 मोबाइल हॅंडसेट असा 12 लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलिस आयुक्‍त महादेव तांबडे यांनी बुधवारी (ता. 12) पत्रकार परिषदेत दिली. विशेष म्हणजे ही टोळी मामा-भाच्याची असून गुन्ह्यातील संशयितांचे वय 21 ते 23 दरम्यान आहे.

तौहिद ज्वेलर्सचे मालक महम्मद जामीर शेख यांचे भावजी असीम मोईन ददापुरे यांनी 9 ऑगस्टला चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, चोरट्यांनी धूम ठोकली. त्यानिमित्त ददापुरे यांचा सितार- ए- शुजाअत पुरस्कार देऊन सन्मान केल्याचे तांबडे यांनी सांगितले.

सहा गुन्ह्यांची उकल 
सोलापुरातील सरस्वती चौकातील कॅनरा बॅंकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न, शहरातील किडवाई चौक येथील तौहिद ज्वेलर्स फोडण्याचा प्रयत्न या टोळीतील गुन्हेगारांनी केला आहे. तसेच उमरगा येथील शिवाजी चौकातील मोबाईल दुकान फोडून 11 हॅंडसेटची चोरी, उमरग्याजवळील बलसूर येथे एसबीआय बॅंकेचे एटीएम गॅस कटरने फोडण्याचा प्रयत्न या टोळीने यापूर्वी केला आहे. मुंबई येथून एक इनोव्हा आणि अंधेरीतून एर्टीगा कार या गुन्हेगारांनी चोरल्याची कबुली दिली आहे.

मामाला भाच्यांची साथ 
सोलापूर शहरातील दोन चोरीच्या प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोन संशयित गुन्हेगारांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. आणखी दोघे फरार आहेत. या टोळीत तानाजी शिवाजी जाधव (वय 22) हा अन्य तीन गुन्हेगारांचा मामा आहे. श्रीकांत पंडित चव्हाण (वय 23), प्रवीण खेमू जाधव (वय 21) आणि राजू उर्फ राजेंद्र रामा राठोड (वय 23) हे तिघे तानाजी याचे भाचे असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. तानाजी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. 

विशेष पथकाची कामगिरी 
पोलिस आयुक्‍त महादेव तांबडे व पोलिस उपायुक्‍त पौर्णिमा चौगुले, सहायक पोलिस आयुक्‍त अभय डोंगरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सूर्यकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शैलेश खेडकर, जयंत चवरे, पोलिस कॉन्स्टेबल संजय बायस, अशोक लोखंडे, राजेश चव्हाण, शंकर मुळे, सुहास अर्जुन, सागर गुंड, संजय काकडे, सायबर शाखेचे संतोष येळे, अर्जुन गायकवाड यांच्या विशेष पथकाने या गुन्हेगारांचा शोध घेतला आणि चोरी उघडकीस आणली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

ढिंग टांग : महाशक्तीचे महावाटप...!

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 03 मे 2024

आंबा : उन्हाळ्याचा अनभिषिक्त राजा

Latest Marathi News Live Update : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोल्हापुरात दाखल, मतदारसंघातील प्रचाराचा घेणार आढावा

SCROLL FOR NEXT