सातारा - काय ठरलं... देवेंद्र फडणवीस, उदयनराजेंमध्ये सातारा जिल्ह्यातील विकासकामांवर चर्चा तर झालीच; पण त्याशिवाय या संवादात अजून काय काय ठरले, ते येत्या काळात दिसेलच.
सातारा - काय ठरलं... देवेंद्र फडणवीस, उदयनराजेंमध्ये सातारा जिल्ह्यातील विकासकामांवर चर्चा तर झालीच; पण त्याशिवाय या संवादात अजून काय काय ठरले, ते येत्या काळात दिसेलच. 
पश्चिम महाराष्ट्र

उदयनराजेंच्या शुभेच्छा अन्‌ मुख्यमंत्र्यांची ऑफर!

सकाळवृत्तसेवा

सातारा - मराठा आरक्षणाचा निर्णय व राज्यात केलेल्या कामांमुळे लोक पाठीशी उभे राहतील, अशा शब्दांत खासदार उदयनराजे भोसले यांनी आज भारतीय जनता पक्षाला आगामी निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या. तर, छत्रपतींच्या शुभेच्छा व लोकांच्या आशीर्वादाच्या जोरावर आगामी निवडणुकीत नक्कीच बाजी मारू, असा विश्‍वास मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला. त्याचबरोबर तुमचा दिल्लीचा मार्ग आम्ही मुंबईपर्यंत सुरळीत करू, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी उदयनराजेंना अप्रत्यक्ष ‘ऑफर’ दिली. त्यामुळे आजच्या कार्यक्रमात अनेकांच्या भुवया उंचावल्या. कार्यक्रमानंतर याचीच चर्चा उपस्थितांमध्ये होती.  

जिल्ह्यातील दहा हजार कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन, उद्‌घाटनांचा कार्यक्रम आज पार पडला. मात्र, तो रंगला उदयनराजे अन्‌ मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांची ‘उदोउदो अन्‌ अप्रत्यक्ष ऑफर’मुळेच. ‘सातारा लोकसभा मतदारसंघातील राजकारण सध्या उदयनराजेंभोवती फिरत आहे. ते कोणत्या पक्षाचे उमेदवार असणार, त्यावरून जिल्ह्याच्या राजकारणाची पुढील दिशा ठरणार आहे. राष्ट्रवादी अंतर्गत कलहही जोरात सुरू आहे. त्यामुळे उदयनराजे काय करणार, याकडे जिल्ह्यातील सर्वांचेच लक्ष आहे.

राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील नेत्यांच्या विरोधात नेहमी कलागती करणाऱ्या उदयनराजेंनी आजही भाजपला आगामी निवडणुकीसाठी शुभेच्छा देऊन टाकल्या. ते म्हणाले, ‘‘मराठा आरक्षणाबाबत सरकारने धाडसी निर्णय घेतला आहे. हा प्रश्‍न मागेच मार्गी लागला पाहिजे होता. पण, का लागला नाही, ते मला माहिती नाही. इच्छाशक्‍ती असेल तर सर्व मार्गी लागते. सध्याच्या सरकारकडे ती  इच्छाशक्‍ती आहे. माझ्याच काय ठिकठिकाणच्या मतदारसंघांतील कामे केली जात आहेत. या कामांची पोचपावती लोक त्यांना देतील. बोलणारे भरपूर असतात. पण, करणारे थोडेच असतात. समाजाचे हित जोपासणाऱ्याच्याच पाठीशी लोक उभे राहतात.’’ उदयनराजेंनी केलेले हे कौतुक व आगामी निवडणुकीचे भविष्य ऐकून दस्तरखुद्द फडणवीसांनीही टाळ्या वाजविल्या. त्यानंतर आपल्या भाषणात फडणवीसांनीही उदयनराजेंना चुचकारले. उदयनराजेंनी आपल्या भाषणात खंडाळा बोगद्याच्या कामामुळे मुंबईला जायचा वेळ कमी होईल असे म्हटले होते. तोच धागा पकडत श्री. फडणवीस म्हणाले, ‘‘महाराज तुम्हाला लवकर मुंबईला पोचता यावे म्हणून आम्ही केवळ खंबाटकी बोगद्याचीच नाही 
तर, पुढचीही व्यवस्था केली आहे.

खोपोली ते खंडाळा या घाटातील वाहतूक कोंडी व लागणारा वेळ कमी करण्यासाठी हा सर्वांत मोठा बोगदा तसेच उड्डाणपूल तयार करत आहोत. तुम्हाला दिल्लीला जायचे असेल तर आम्ही तुमचा मुंबईपर्यंतचा प्रवास सुखकर व कमी वेळेत होईल, याची सोय करून ठेवतो.’’ फडणवीसांनी अप्रत्यक्षपणे त्यांच्या भाषणातून उदयनराजेंना आवतानाचे कार्यकर्त्यांनीही शिट्ट्या वाजवून स्वागत केले. त्यामुळे मंचकावर बसलेल्या काही मान्यवरांबरोबरच उपस्थितांच्याही भुवया उंचावल्या. उदयनराजेंचे नेमके चाललेय काय, अशी चर्चा कार्यक्रमानंतर होत होती.

फडणवीसांनी जोडले हात
खासदारांचे भाषण संपल्यानंतर ते खुर्चीकडे निघाले, त्याच वेळी उदयनराजेंच्या भाषणावर टाळ्या वाजवत खूष झालेल्या फडणवीसांनी चक्‍क उदयनराजेंना हात जोडून नमस्कार केला. काही वेळाने चंद्रकांत पाटील यांचे भाषण होऊन ते आसनस्थ होण्यास आले. तोपर्यंत उदयनराजे मुख्यमंत्र्यांशेजारी चंद्रकांतदादांच्या खुर्चीवर बसले होते. दादांनी उदयनराजेंना तेथेच बसवत ‘तुम्ही आमच्यातच बसा,’ असाच जणूकाही संदेश दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे पहिल्यांदाच काँग्रेसला देणार मत; मतदानापूर्वी केली मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update: लोकसभेच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी लातूरमधील उदगीर येथे दाखल

Majhyashi Nit Bolaycha Rap Song: अनीचा आळस आणि आईचा ओरडा; 'या' तरुणानं लिहिलेलं भन्नाट रॅप साँग सोशल मीडियावर घालतंय धुमाकूळ

Summer Trip: उन्हाळ्यात चेरापुंजीला फिरायला जाण्याता प्लॅन करत असाल तर 'या' ठिकाणांना नक्की भेट द्या

IPL 2024 DC vs MI Live Score : वूडने मुंबईला मिळवून दिलं तिसरं यश, पण दिल्लीचीही 200 धावांकडे वाटचाल

SCROLL FOR NEXT