Udyanraje Bhosale
Udyanraje Bhosale 
पश्चिम महाराष्ट्र

मराठा आरक्षणाचा भाजपचा निर्णय धाडसी: उदयनराजे (व्हिडिओ)

सकाळवृत्तसेवा

सातारा : मराठा आरक्षणाबाबत राज्यातील भाजप सरकारने घेतलेला निर्णय हा धाडसी होता. या सरकारने केलेल्या कामांची पोहचपावती जनतेकडून नक्की मिळेल, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपवर स्तुतीसुमने उधळली.

साताऱ्यात आज (रविवार) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनेक विकासकामांचे भूमीपूजन करण्यात आले. यावेळी उदयनराजे उपस्थित होते. उदयनराजे यांनी यापूर्वीही भाजपची स्तुती केलेली आहे. 
 
उदयनराजे म्हणाले, की मराठा आरक्षणाचा निर्णय मागेच लागायला पाहिजे होता. पण, का लागला नाही याविषयी मी काही बोलणार नाही. इच्छाशक्ती असेल तर आपण काहीही करू शकतो. सध्याच्या सरकारकडे इच्छाशक्ती असल्याने त्यांना मार्ग मिळतो. या सरकारने माझ्या मतदारसंघासह ठिकठिकाणी केलेल्या कामांची पोहचपावती त्यांना नागरिक देतील अशी मला खात्री आहे. बोलण्यापेक्षा करणे हे महत्त्वाचे असते. समाजाचे हित जोपासतात त्यांनाच नागरिकांचा पाठिंबा मिळतो. मराठा आरक्षणाचा अत्यंत धाडसी निर्णय भाजपने घेतला. या केलेल्या कामाची पोहच पावती लोक नक्की देतील
.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT