Unless the demands are met strike continues
Unless the demands are met strike continues sakal
पश्चिम महाराष्ट्र

महसूल कर्मचाऱ्यांचा संप सुरूच

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील महसूल कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. ग्रामीण आणि शहरातून आलेल्या नागरिकांची या संपामुळे अडचण झाली. कोणत्याही विभागात कर्मचारी जागेवर नसल्यामुळे बहुतांश नागरिकांची कामे जागेवरच थांबली आहेत. त्यामुळे कर्मचारी जागेवर नाहीत. सांगा, आमची कामे कशी होतील? अशी थेट तक्रार नागरिकांनी वरिष्ठांकडे केली. त्यामुळे वरिष्ठांकडे याबाबत उत्तर नव्हते. निवेदन आणि कामांची अडचण सांगण्यासाठी सोमवारी नागरिकांनी वरिष्ठांकडे गर्दी केली होती. संजय गांधी निराधार कार्यालयाच्या समोर महसूल कर्मचाऱ्यांनी सतरंजी टाकून तिथे ठिय्या मारला आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत, तोपर्यंत बेमुदत संप मागे घेतला जाणार नाही, असा इशारा महसूल कर्मचारी संघटनेने दिला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाची अडचण झाली आहे.

महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष शंतनू गायकवाड, जिल्हाध्यक्ष जयंत जुगदार, शहराध्यक्ष संदीप लटके, जिल्हा सरचिटणीस अमर भिंगे यांच्यासह मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते. महसूल सहाय्यक, वाहन चालक तसेच चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना मागील पाच वर्षात पदोन्नती मिळालेली नाही. अव्वल कारकून, मंडलाधिकारी संवर्गातून नायब तहसीलदार संवर्गात पदोन्नती मिळालेली नाही.

नायब तहसीलदार पदाला राजपत्रित दर्जा देऊन ग्रेडमधील त्रुटी दूर करा, अस्थायी पदे कायम करा, गृह विभागाच्या धर्तीवर महसूल विभागातील कर्मचाऱ्यांना कॅशलेस वैद्यकीय सुविधा उपलब्ध करा, कोतवाल कर्मचाऱ्यांना चतुर्थ श्रेणीमध्ये पदोन्नती द्या यासह इतर अनेक मागण्यांसाठी महसूल कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे.विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील महसूल कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. ग्रामीण आणि शहरातून आलेल्या नागरिकांची या संपामुळे अडचण झाली. कोणत्याही विभागात कर्मचारी जागेवर नसल्यामुळे बहुतांश नागरिकांची कामे जागेवरच थांबली आहेत.

त्यामुळे कर्मचारी जागेवर नाहीत. सांगा, आमची कामे कशी होतील? अशी थेट तक्रार नागरिकांनी वरिष्ठांकडे केली. त्यामुळे वरिष्ठांकडे याबाबत उत्तर नव्हते. निवेदन आणि कामांची अडचण सांगण्यासाठी सोमवारी नागरिकांनी वरिष्ठांकडे गर्दी केली होती. संजय गांधी निराधार कार्यालयाच्या समोर महसूल कर्मचाऱ्यांनी सतरंजी टाकून तिथे ठिय्या मारला आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत, तोपर्यंत बेमुदत संप मागे घेतला जाणार नाही, असा इशारा महसूल कर्मचारी संघटनेने दिला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाची अडचण झाली आहे.

महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष शंतनू गायकवाड, जिल्हाध्यक्ष जयंत जुगदार, शहराध्यक्ष संदीप लटके, जिल्हा सरचिटणीस अमर भिंगे यांच्यासह मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते. महसूल सहाय्यक, वाहन चालक तसेच चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना मागील पाच वर्षात पदोन्नती मिळालेली नाही. अव्वल कारकून, मंडलाधिकारी संवर्गातून नायब तहसीलदार संवर्गात पदोन्नती मिळालेली नाही. नायब तहसीलदार पदाला राजपत्रित दर्जा देऊन ग्रेडमधील त्रुटी दूर करा, अस्थायी पदे कायम करा, गृह विभागाच्या धर्तीवर महसूल विभागातील कर्मचाऱ्यांना कॅशलेस वैद्यकीय सुविधा उपलब्ध करा, कोतवाल कर्मचाऱ्यांना चतुर्थ श्रेणीमध्ये पदोन्नती द्या यासह इतर अनेक मागण्यांसाठी महसूल कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

IPL 2024, CSK vs PBKS: पंजाब किंग्सने करून दाखवलं, चेन्नईला सलग पाचव्यांदा हरवलं

ग्रीन नोबेलचा मानकरी

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

SCROLL FOR NEXT