पश्चिम महाराष्ट्र

विजयादशमीच्या मुहूर्तावर सोलापुरात 'अर्बन प्लाझा' खुले 

विजयकुमार सोनवणे

सोलापूर : स्मार्ट सिटीतील पहिले आकर्षण असणारे 'अर्बन प्लाझा' विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर नागरिकांसाठी खुले होण्याची शक्‍यता आहे. प्लाझा उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. 100 सोलर पॅनल आणि 36 एलईडी व्हिडीओ स्क्रीनचा झगमगाट हा या प्लाझाचे आकर्षण असणार आहे.

या प्लाझाची उभारणी पूर्णपणे सौरऊर्जेवर आधारित असणार आहे. रूपांतरीत रंगभवन चौक हा सोलापूर शहरातील एक वैशिष्ट्यपूर्ण परिसर असणार आहे. मध्यभागी असलेल्या जागेवर अर्धछायांकित "अर्बन प्लाझा'ची उभारणी सुरू आहे. या परिसरातील एलईडी दिवे सौरऊर्जेवर लावण्यात येणार असल्याने महापालिकेस कोणत्याही प्रकारचा विजेचा भुर्दंड बसणार नाही. तसे या परिसरात अतिशय आकर्षक पद्धतीची रचना केली जाणार आहे.

या ठिकाणी असलेल्या 36 एलईडी व्हिडीओ पॅनल्सपैकी काही पॅनल्स हे लोकांना सूचना देण्यासाठी वापरण्यात येणार आहेत. गुड मॉर्निंग सोलापूरकर...गुड आफ्टरनून सोलापूरकर..हा मंजुळ आवाज लवकरच त्यातून ऐकण्यास मिळणार आहे. या पॅनलवरून केवळ 'गुड मॉर्निंग किंवा गुड आफ्टरनून'ने स्वागत करण्यापुरते मर्यादित नसेल. तर लोकांचे प्रबोधनही केले जाणार आहे. जसे स्वच्छता राखा, वाहनांचे नियम पाळा, वाहनातून प्रदूषण होणार नाही याची दक्षता घ्या, या सूचनाही या भिंतीच्या माध्यमातून दिल्या जाणार आहेत. ग्रामदैवत सिद्धेश्‍वर यात्रेच्या कालावधीत भाविकांनी घ्यावयाची दक्षतेच्याही सूचना दिल्या जाणार आहेत.

पार्किंग आणि क्रॉसिंगची सोय

या चौकाभोवती योग्य प्रकारचे पार्किंग आणि क्रॉसिंगची सोय असणार आहे. त्यावर जाहिराती करून महापालिकेचे उत्पन्न वाढविले जाणार आहे. या कामाचा मक्ता मुंबईतील राजश्री कन्स्ट्रक्‍शनला देण्यात आला आहे. या कामासाठी सुमारे पावणेपाच कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Rally Pune: "एका अतृप्त आत्म्यानं महाराष्ट्रासह देशाला अस्थिरतेत लोटलं"; PM मोदींकडून नाव न घेता शरद पवारांवर घणाघाती टीका

Modi Rally Pune: "तुम्ही लवकरच देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमधून प्रवास कराल"; PM मोदींनी पुणेकरांना दिली गॅरंटी

Latest Marathi News Live Update : पुण्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर निशाणा

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Aamir Khan : आणि 'महाराष्ट्र बंद' ने पालटलं आमिरचं नशीब

SCROLL FOR NEXT