Vaibhav pichad said I'm not afraid, ready for political wrestling 
पश्चिम महाराष्ट्र

डरायचं नाही आता लढायचं...पिचड कुस्तीसाठी रेडी

सकाळ वृत्तसेवा

अकोले : निवडणुकीतील पराभवाने काही दिवस नाराज झालो होतो. पण एक निवडणूक हरलो म्हणून काय झालं? पैलवान पराभव झाला, म्हणून आखाड्याकडे पाठ फिरवित नाही. पुन्हा नव्या उमेदीने तो कुस्तीला तयार असतो. जनतेने भूलथापांना बळी न पडता खऱ्या सोन्याची किंमत करावी. माझ्या कार्यकर्त्यांना बदनाम केल्यास, जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा माजी आमदार वैभव पिचड यांनी दिला. 

विरोधक केवळ शिव्याशाप देतात.. 
कुमशेत येथील धारेराव मंदिर जीर्णोद्धार कार्यक्रमात पिचड बोलत होते. माजी मंत्री मधुकर पिचड, पांडुरंग कचरे, सभापती दत्तात्रेय बोऱ्हाडे, उपसभापती दत्तात्रेय देशमुख, आदिवासी सेवक काशिनाथ साबळे उपस्थित होते. 
वैभव पिचड म्हणाले, ""विरोधकांनी माझ्या माध्यमातून स्वतःचा विकास केला. आता तेच लाभार्थी विरोधक विचारतात, 40 वर्षांत काय केलं? त्यांनी आत्मपरीक्षण करावे? तोलारखिंड, औद्योगिक वसाहत, उर्वरित प्रश्न मार्गी लावावेत. केवळ शिव्या-शाप देणे, हा एकमेव कार्यक्रम विरोधकांचा आहे.'' 

धारेराव देवाला प्रार्थना करतो... 
""कुमशेतच्या ग्रामस्थांनी मंदिर जीर्णोद्धारासाठी निधीची मागणी केली होती. त्याप्रमाणे काम पूर्ण झाले. पुढेही या भागाच्या विकासासाठी सर्वोतोपरी मदत केली जाईल. अनेक वर्षे आपल्यात वागलो. विकासकामे केली. त्याचा गावाला लाभही झाला. मंदिरातून संस्काराची बीजे रोवली जातात; मात्र तालुक्‍यातील विरोधक मंदिरात सभा घेऊन शिव्याशाप देतात. तुमची दिशाभूल करतात. त्यांना त्यांचे काम करू द्या. धारेराव मंदिरापासूनच पुढील निवडणूक सुरू होईल. मी धारेराव देवाला प्रार्थना करतो, की विरोधकांनी या परिसरातील विकासकामांच्या निधीला कात्री लावू नये,'' असे पिचड म्हणाले. 

आदिवासी संस्कृतीचे जतन व्हावं 
आदिवासी संस्कृतीचे संवर्धन करताना, या भागातील पर्यटनही वाढावे, यासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन पर्यटन संस्था स्थापन कराव्यात. हरिश्‍चंद्रगड, कुमशेत परिसराचा विकास झाल्यास या परिसरात रोजगारनिर्मिती होईल, असा विश्‍वास माजी मंत्री मधुकर पिचड यांनी व्यक्त केला. प्रास्ताविक सरपंच सयाजी अस्वले यांनी केले. सूत्रसंचालन सी. बी. भांगरे यांनी केले. गंगाराम धिंदळे यांनी आभार मानले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amravati News : 'सिंचन अनुशेष निर्मूलनाचे जनक' प्रा. बी. टी. देशमुख यांचे देहावसान; तब्बल तीस वर्षे विधीमंडळाचे केले प्रतिनिधीत्व

Porsche Car Accident Case : अगरवालचा जामीन रद्द करण्यासाठी पोलिसांची न्यायालयात धाव

कोण होती 'मोगली गर्ल'? २०१७ ला वयाच्या ८ व्या वर्षी सापडली जंगलात, १८ वर्षी निधन

बुलेट छब्या गेला! बैलगाडा शर्यतीतील हिंदकेसरीची एक्झिट; अंत्यसंस्काराला हजारोंचा जनसागर, थार अन् लाखोंची बक्षिसे जिंकली...

Pune News : डॉ. प्रदीप कुरुलकर विरुद्ध दोषारोप निश्चित; जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुनावणीला सुरुवात

SCROLL FOR NEXT