Love Story esakal
पश्चिम महाराष्ट्र

Valentine Day 2023 : ‘व्हॅलेंटाईन डे’ला १३ जोडपी लग्नाच्या बेडीत!

निपाणी तालुक्यातील चित्र, प्रेमाच्या दिवशी शुभमंगलचा धडाका

- राजेंद्र हजारे

निपाणी : ‘व्हॅलेंटाइन डे’ म्हणजे तरुणाईसाठी प्रेमाचा उत्सव झाला आहे. प्रेम व्यक्त करण्यासाठी हा दिवस खास मानला जात आहे, पण हा दिवस आयुष्यभर लक्षात राहावा, यासाठी गेल्या काही वर्षांपासून १४ फेब्रुवारीला लग्नाचा धूमधडाका उडवण्याची क्रेझ वाढत आहे. यादिवशी पंचांगानुसार लग्न मुहूर्तही असल्याने ‘शुभमंगल’ म्हणत अनेक जोडपी बोहल्यावर चढली. निपाणी तालुक्यात १३ जोडपी लग्नबेडीत अडकली.

दुसरीकडे शहर व ग्रामीण भागात लहान-मोठ्या प्रमाणात विवाह सोहळे झाल्याने मंगल कार्यालये, भटजी, आचारी, बँड वाल्यांना चांगले दिवस सुरू झाले आहेत. मंगळवारी (ता. १४) ‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा करण्यासाठी प्रेमीयुगुलांची तयारीही आठवड्यापूर्वी पूर्ण झाली होती. त्या पार्श्वभूमीवर कोरोनामुळे रखडलेली विवाह कार्ये त्याच दिवशी पूर्ण करण्याचा अनेक कुटुंबीयांनी निर्णय घेतला होता. त्यानुसार ‘व्हॅलेंटाईन डे’चा मुहूर्त साधत अनेकांनी विवाह सोहळे पार पाडले.

अनेक मंगल कार्यालये या दिवशी गजबजलेली दिसून आली. काही कुटुंबीयांनी आपल्या घरासमोरच मंडप घालून साध्या प्रमाणात विवाह सोहळे आटोपले. जोडप्यांना जास्त वेळ ताटकळत न ठेवता त्यांचा हा दिवस खास बनविण्यासाठी अनेक कुटुंबीयांनी आठवड्यापूर्वीच तयारी करून ठेवली होती. दरम्यान, १४ फेब्रुवारीला पंचांगानुसार विवाहाचा चांगला योग होता. त्यामुळे या दिवशी लग्नाचा धुमधडाका उडाला.

लग्नाचे बार धूमधडाक्यात

गेल्या वर्षी कोरोनाचे सावट कमी झालेले असले तरी भीतीपोटी अनेकांनी विवाह सोहळे वर्षभर पुढे ढकलले होते. यंदा कोरोना नसल्याने विवाह सोहळ्यांचा बार आता धूमधडाक्यात उडणार आहे. त्यामुळे विवाह सोहळ्याशी संबंधित असलेल्या सर्वच व्यावसायिकांच्या हाताला काम मिळणार आहे.

कोरोनामुळे दोन वर्षांपासून विवाह ठरवूनही तो करता आला नव्हता, पण आता संसर्ग कमी झाल्याने आठवड्यापूर्वी सर्व तयारी करून विवाहाची आठवण राहावी यासाठी व्हॅलेंटाईन डे चा मुहूर्त साधला.

-सुरेश चव्हाण, नवविवाहित, निपाणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chiplun : थारची रिक्षाला भीषण धडक, ५ जणांचा मृत्यू; चिमुकल्यासह आई-वडिलांचा मृतांमध्ये समावेश

Suryakumar Yadav Catch: बाऊंड्री लाईन मागे केली होती...! सूर्याच्या 'त्या' अविश्वसनीय कॅचवर भारतीय खेळाडूचा धक्कादायक दावा

Pune Airport : पुण्यात पावसाचा फटका; विमानसेवा विस्कळित, प्रवाशांची गैरसोय

Latest Marathi News Live Updates : उड्डाणपूल तयार पण नेत्यांना उद्घाटनाला वेळ मिळेना, सिंहगड रस्ता 'जॅम'

Mobile Recharge Price Increase : मोबाईल रिचार्ज महागले; 'या' बड्या कंपनीने बंद केला लोकप्रिय प्लॅन, ग्राहकांमध्ये संताप..

SCROLL FOR NEXT