पश्चिम महाराष्ट्र

औषधांची होणार फेरपडताळणी  - संपदा मेहता 

सकाळवृत्तसेवा

सोलापूर - सोलापुरातील मार्कंडेय रुग्णालयानंतर आता औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयातील औषधांमध्ये काळपट बुरशी आढळली. त्यामुळे रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची चिंता वाढली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर निकृष्ट औषधांचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. तसेच पुरवठा केलेल्या औषधांची फेरपडताळणी केली जाईल, असे "हाफकीन'च्या व्यवस्थापकीय संचालिका संपदा मेहता यांनी सांगितले. 

राज्यात सुमारे एक हजार 800 प्राथमिक आरोग्य केंद्रे असून, 250 ग्रामीण रुग्णालये आहेत. तसेच 17 मेडिकल कॉलेज आणि 30 सिव्हिल रुग्णालये तसेच महापालिका, नगरपालिकांच्या रुग्णालयांनाही हाफकीनच्या माध्यमातूनच औषधांचा पुरवठा केला जातो. परंतु, सर्वच औषधे हाफकीन तयार करीत नाही तर अन्य कंपन्यांकडूनही ती खरेदी करण्यात येतात, असे मेहता म्हणाल्या. तत्पूर्वी, औषध तयार झाल्यानंतर त्यांच्या स्वत:च्या लॅबमध्ये पडताळणी केली जाते. तसेच औषध खरेदी केल्यानंतर पुन्हा सरकारी लॅबमध्येही त्या औषधांची पडताळणी होते. मात्र, औरगांबाद येथील शासकीय रुग्णालयातील रॅनिटीडीन इंजेक्‍शनमध्ये काळपट बुरशी आढळली. त्या पार्श्‍वभूमीवर त्याचे नमुने अन्न व औषध प्रशासनाकडे तपासणीकरिता पाठविले असून त्याचा अहवाल आल्यानंतर संबंधित कंपनीवर कडक कारवाई केली जाईल, असेही मेहता यांनी या वेळी सांगितले. 

मागणी केल्यापासून संबंधित रुग्णालयांना किमान आठ-नऊ महिन्यांनंतर औषधांचा पुरवठा होत असल्याने राज्यात मागील काही महिन्यांपासून औषधांचा तुटवडा असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. 

विविध शासकीय रुग्णालयांच्या मागणीनुसार औषध पुरवठा केला जात आहे. सद्यःस्थितीत सुमारे 725 निविदांद्वारे 450 कोटी रुपयांची औषधे खरेदी केली जात आहेत. मात्र, रुग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्या औषध कंपन्यांवर थेट कारवाई केली जाईल. 
- संपदा मेहता, व्यवस्थापकीय संचालिका, हाफकीन 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

IPL 2024 RCB vs GT Live Score: शुभमन गिलही स्वस्तात बाद! गुजरातच्या दोन्ही सलामीवीरांना सिराजने धाडले माघारी

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

SCROLL FOR NEXT