पश्चिम महाराष्ट्र

Vidhan Sabha 2019 : संजय घाटगे यांचा साधेपणाने उमेदवारी अर्ज 

सकाळ वृत्तसेवा

कागल - कागल विधानसभा मतदारसंघातून आज माजी आमदार संजय घाटगे यांनी उमेदवारी अर्ज दाखले केला. आज दिवसभरात आठ उमेदवारांनी नऊ अर्ज दाखल केले. यामध्ये आमदार हसन मियालाल मुश्रीफ (राष्ट्रवादी), नवीद हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी), संजय आनंदराव घाटगे (शिवसेना), सुयशा अंबरिशसिंह घाटगे (अपक्ष), दयानंद नानासो पाटील (अपक्ष), नवोदिता समरजितसिंह घाटगे (अपक्ष) यांनी प्रत्येकी एक अर्ज व समरजितसिंह विक्रमसिंह घाटगे (अपक्ष) यांनी दोन अर्ज दाखल केले.

रवींद्र तुकाराम कांबळे (बसप) यांनी काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. आजअखेर एकूण आठ उमेदवारांचे नऊ अर्ज दाखल झाले आहेत. आज सकाळी माजी आमदार संजय आनंदराव घाटगे (शिवसेना) यांनी साधेपणाने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

त्यांच्याबरोबर खासदार संजय मंडलिक, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, अंबरिशसिंह घाटगे उपस्थित होते. त्याबरोबर त्यांच्या स्नुषा सुयशा अंबरिशसिंह घाटगे यांनीही अर्ज दाखल केला. राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ व त्यांचे पुत्र नवीद मुश्रीफ, शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे व त्यांच्या पत्नी नवोदिता घाटगे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शनाद्वारे उमेदवारी अर्ज भरले.

यावेळी शहरात मोठा जमाव जमा झाला होता. मात्र अपर पोलिस अधीक्षक श्रीनिवास घाटगे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. प्रशांत अमृतकर, कागल पोलिस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय नाळे, मुरगूडचे सहायक पोलिस निरीक्षक भगवान शिंदे, एमआयडीची (शिरोली)चे सहायक पोलिस निरीक्षक किरण भोसले, उपनिरीक्षक प्रीतमकुमार पुजारी यांच्यासह शंभर पोलिस व तीस गृहरक्षक दलाचे जवान यांनी चोख बंदोबस्त ठेवला. त्यामुळे आजचे शक्तिप्रदर्शन शांततेत झाले. 

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांताधिकारी दीप्ती सूर्यवंशी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार शिल्पा ठोकडे, गटविकास अधिकारी डॉ. शबाना मोकाशी काम पाहत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

Ganesh Naik: आम्हाला प्रेमाने दिलेला आदेश आवडतो, तंबी देणारा जन्मलेला नाही

IPL 2024 LSG vs KKR : ४८ तासांच्या आत कोलकता पुन्हा मैदानात! लखनौ सुपर जायंटस् विरुद्ध आज सामना

Poonch Attack: 30 महिने... सहावा हल्ला अन् 21 जवानांचे बलिदान; भारतीय लष्कर सतत ठरत आहे दहशतवाद्यांचे टार्गेट

Latest Marathi News Live Update : सुनेत्रा पवार यांच्यासाठी अजित पवार यांची सांगता सभा

SCROLL FOR NEXT