Vikhe Patil invites PM Modi to visit Pravara
Vikhe Patil invites PM Modi to visit Pravara 
पश्चिम महाराष्ट्र

मोदीसाहेब या एकदा लोणीला, विखे पाटलांचं पंतप्रधानांना आवतान 

सकाळ वृत्तसेवा

नगर ः दिवंगत लोकनेते बाळासाहेब विखे पाटील यांनी लिहिलेल्या "देह वेचावा कारणी' या आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा प्रवरा परिवारातर्फे आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याचे निमंत्रण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देण्यात आले आहे. 

आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रवरा परिवारातर्फे नवी दिल्ली येथे संसद भवनात हे निमंत्रण दिले. त्या वेळी विखे पाटील यांनी साईबाबांची मूर्ती आणि शाल देऊन पंतप्रधानांचा सत्कार केला. खासदार डॉ. सुजय विखे पाटील या वेळी उपस्थित होते. 

पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे निमंत्रण

दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांनी लिहून ठेवलेल्या "देह वेचावा कारणी' या आत्मचरित्रात त्यांच्या संपूर्ण जीवनगाथेचे वर्णन केले आहे. त्यांच्या आठवणींना उजाळा म्हणून हा सोहळा होणार असल्याचे सांगण्यात आले.

 
प्रवरानगर येथे आतापर्यंत देशातील सर्वोच्च सत्ताधिशांनी हजेरी लावली आहे. राजकारणासोबतच सामाजिक, साहित्यिक, कला, क्रीडा क्षेत्रातील मान्यवरही आलेले आहेत. 

दिग्गज प्रवरातिरी

राज्यपालांपासून राष्ट्रपतींपर्यंत सर्वांनीच प्रवरेला भेट दिली आहे. दिवंगत राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलामही प्रवरेत आले होते. त्या सर्वांनीच विखे पाटील परिवाराच्या कर्तृत्वाचा गुणगौरव केला होता. खासदार डॉ. सुजय विखे यांच्या रूपाने विखे पाटील परिवारातील चौथी पिढी विकासकामाची धुरा पुढे नेत आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT