Vikhe Patil will pay two months salary for Corona patients
Vikhe Patil will pay two months salary for Corona patients 
पश्चिम महाराष्ट्र

कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी विखे पाटील दोन महिन्यांचे मानधन देणार

सकाळ वृत्तसेवा

लोणी -  माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमदार म्हणून मिळणारे दोन महीन्यांचे मानधन कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्याचा निर्णय घेतला आहे.लोकप्रतिनिधी म्हणून  निर्णय घेणारे पहीले आमदार ठरले आहेत.

यासंदर्भात बोलताना आ.विखे पाटील म्हणाले की,कोरोना सारख्या राष्ट्रीय आपतीच्या विरोधात एकजूटीने लढाई करण्याची वेळ आली आहे.याची सुरूवात स्वतःपासून करावी म्हणून मिळणारे मानधन मुख्यमंत्र्यांच्या सहायता निधीत जमा करण्याचा निर्णय आपण घेतला आहे.

कोरोना व्हायरसच्या संदर्भात काळजी घेण्याबाबत जनजागृती करण्यात येत असली तरी राज्यातील रुग्णांची वाढती संख्या ही चिंताजनक बाब आहे.या रुग्णांच्या उपचारासाठी योगदान म्हणून आता सहकार्याचे हात पुढे येवू लागले आहेत.उद्योग क्षेत्राने देखील मदतीसाठी एक पाउल पुढे टाकले आहे ही समाधानाची बाब असल्याचे नमूद करून आ.विखे पाटील म्हणाले की,लोकप्रतिनिधी या नात्याने आपली असलेली जबाबदारी म्हणून दोन महीन्यांचे  मानधन देण्याचा निर्णय घेतला आहे.भविष्यात आणखी  काही निर्णय घेवून कोरोनाच्या विरोधातील या लढाईत योगदान देणार असल्याचे आवर्जून नमूद केले.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT