viraj cane agro.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

यंदाच्या गळीत हंगामासाठी विराज केन ऍग्रो सज्ज : देविखिंडीत कारखान्याकडून ऊसतोडीस प्रारंभ 

सचिन निकम

लेंगरे (सांगली)-  यंदाच्या गळीत हंगामातील ऊसाच्या तोडीसाठी विराज केन ऍग्रो सज्ज झाला असुन कारखान्याची या हंगामातील पहिली टोळी देविखिंडीत दाखल झाली आहे.ऊसतोडीस प्रारंभ केला आहे.गेल्या वर्षीच्या तुलनेत विराजने यंदाचा गाळप हंगाम इतर कारखान्यापेक्षा अगोदर सुरु केल्यामुळे ऊसाला तोड मिळू लागल्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.चालू वर्षातील गळीत पुर्णक्षमतेने करणार असल्याचे कारखान्याचे कार्यकारी संचालक वैभव पाटील यांनी सांगितले.

कोरोनाच्या या महामारीच्या काळात ऊस वेळेत तुटेल की अशी शाश्वती नसताना विराजने ऊसतोडीस सुरुवात केल्याने शेतकरी आनंदीत आहे. विराज केन्सच्या चालू वर्षातील गळीत हंगामाची दिमाखात सुरुवात झाली आहे.या गळीत हंगामात विराज केन्स हे युनिट पूर्ण क्षमतेने चालवणार असून या हंगामात 1.25 लक्ष मेट्रिक टन एवढे गाळपाचे उद्दिष्ट कारखान्याकडून ठेवण्यात आले आहे.यासाठी लागणारी सर्व ऊस तोड यंत्रणा सज्ज ठेवल्याने ऊसतोडीस वेळेत प्रारंभ झाला आहे.

तरी परिसरातील शेतकरी व सभासद यांनी आपला ऊस हा कारखान्याला देऊन लाभ घ्यावा असे आवाहन केले. त्याचबरोबर उसाला रास्त भाव व करेक्ट वजन देऊन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यार असल्याचे सांगितले होते.त्यामुळे कोरोनाच्या आपत्ती काळात ऊस उत्पादक शेतकर्याना आधार दिल्यामुळे शेतकर्याना भेडसावणारा प्रश्न निकाली निघत असल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

देविखिंडी येथे कृषी विभागाच्या मार्गदर्शन खाली ऊस उत्पादक शेतकर्यानी आर्दश बचत गटांनी स्थापना केली आहे.या गटातील शेतकर्यानी कारखान्याकडे टोळीची मागणी केली होती.त्यानुसार ऊसतोड कामगार आल्यानंतर तात्काळ टोळी देत गटातील शेतकर्याची ऊसतोड सुरु करण्यात आली.ऊस लागणीनुसार ऊस तोडीला प्राधान्य देऊन क्रमाक्रमाने ऊस तोड केली जाणार असल्याचे गटाचे अध्यक्ष महादेव शिंदे यांनी सांगितले. 


संपादन : घनशाम नवाथे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT