vishwajeet.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

विश्‍वजीत कदम यांचा सवाल : भाजपने महापुरात काय मदत केली? 

सकाळवृत्तसेवा

सांगली-भाजपने महापूराच्या काळात काय मदत केली हे सर्वांनाच माहिती आहे. कोरोना साथीच्या काळात सरकारच जबाबदारीने काम करीत असताना मदतीपेक्षा राजकीय टीका करण्यातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील समाधानी आहेत, असे मत कृषी व सहकार राज्यमंत्री विश्‍विजित कदम यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना दिली. 


सांगली शहरातील एस-टी बसस्थानक, सिव्हिल हॉस्पिटल आणि मार्केट यार्डातील शिवभोजन केंद्रांना मंत्री श्री. कदम यांनी भेटी दिल्या. त्यांनी शहरातील रेशन दुकानांनाही भेटी देवून पाहणी केली. जिल्हा परिषदेतही त्यांनी आढावा बैठक घेतली. त्यावेळी आमदार विक्रम सावंत, सीईओ अभिजित राऊत यांच्यासह विभागप्रमुख उपस्थित होते. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. 


मंत्री कदम म्हणाले, ""भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे सत्ताधाऱ्यांना सहकार्य करण्यापेक्षा टीका करीत आहे. कोरोना पार्श्‍वभूमिवर भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून काम करीत आहेत, असे त्यांचे मत आहे. वास्तविक महापुराच्या काळात भाजप नेत्यांनी जनतेला काय मदत केली ही सर्वांना माहीत आहे. विरोधक म्हणून टीका करावी पण चांगल्या कामाचे कौतुक सुद्धा करावे. चंद्रकांतदादांसारख्या जेष्ठ नेत्याने असे वक्तव्य करणं चुकीचे आहे. कोरोनाच्या संकटात कोणीही राजकारण करू नये.'' आत्ता सर्वांनी एकत्रित काम करण्याची वेळ असल्याचेही मंत्री कदम यांनी स्पष्ट केले. 
ते म्हणाले, ""शहरातील शिवभोजन केंद्रातून गरजूंना चांगला फायदा होत आहे. पहिल्या दीड तासातच सर्व म्हणजे उद्दिष्टपूर्ती होत आहे. रेशन दुकानांतुनही धान्यांची उचल सर्व सामान्य करीत आहेत.'' 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहील मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट! परीक्षेदरम्यान प्राध्यापकांनी बाजूला नेलं अन्..., CCTV फुटेज समोर, 15 मिनिटांत काय घडलं?

Junnar News : शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले.

लहानपणीचं गाणं आजही तोंडपाठ आहे, पण कालचा अभ्यास लक्षात राहत नाही; असं का? जाणून घ्या मेंदूचं रहस्य

Marathi News Live Updates: धाराशिवमध्ये पावसाला सुरुवात

DPL Fixing Controversy: दिल्ली प्रीमियर लीगमध्ये फिक्सिंगचा संशय? वंश बेदीकडे क्रिकेटपटूचा संपर्क; लगेच दिली अँटी करप्शनला माहिती

SCROLL FOR NEXT