Vishwajeet-Sangram Singh face to face; The meeting took place at Kadegaon center during polling 
पश्चिम महाराष्ट्र

विश्‍वजीत-संग्रामसिंह आमनेसामने; कडेगाव केंद्रावर मतदानादरम्यान झाली भेट 

सकाळवृत्तसेवा

सांगली ः पुणे पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांनी कडेगाव येथे मतदानाचा हक्क बजावला. यावेळी योगायोगाने राज्यमंत्री विश्‍वजीत कदम देखील आले होते. कडेगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या मतदान केंद्रांमध्ये देशमुख यांनी आपलं मत नोंदवलं. पुणे पदवीधर मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांचे उमेदवार हे सांगली जिल्ह्यातील असून त्यामुळे सांगली जिल्ह्यात चुरशीने मतदान सुरू आहे. 


मतदानाकेंद्राजवळील एका कार्यकर्त्याच्या घरी चहा घेतला. निवडणूक खिलाडु वृत्तीने लढवायची असते ही फक्त सदिच्छा भेट असल्याचा खुलासा दोघांनीही आवर्जून केला. दरम्यान महाआघाडीचे उमेदवार अरुण लाड यांनी पलूस मतदान केंद्रात मतदानाचा हक्क बजावला. श्री देशमुख यांनी आपला विजय निश्‍चित असल्याचा दावा केला. पक्षाचे पाचही जिल्ह्यातील नेटवर्क आणि कार्यकर्त्यांचे जाळे विजय मिळवून देईल असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. 


लाड यांनीही विजयाचा दावा केला. ते म्हणाले,"" हा मतदारसंघ आपल्या मालकीचा आहे असं ज्या पक्षाला वाटत होतं त्यांना यावेळी बदलेलला मतदार योग्य संदेश देईल. सुशिक्षित आणि खेडोपाडी गावा गावातील शहरातील मतदार बंधू भगिनी मोठ्या संख्येने मतदान करतील असा दावाही त्यांनी केला. 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Opening Ceremony: आयपीएलचा उद्घाटन सोहळा होणार नाही, 'त्या' ११ जणांसाठी घेतला निर्णय; निरोप समारंभ मात्र दणक्यात...

Latest Marathi News Live Update : रामनवमीच्या दिवशी तुळजाभवानी मातेच्या मंदिराचा 23 वा उत्सव

'ट्रम्पजी, मला LPG सिलिंडर पाठवा!' बोमन ईरानींची व्हिडिओद्वारे ट्रम्प यांच्याकडे मागणी, म्हणाले,'कस्टर्ड, धनसक घाऊ घालतो पण...'

Income Tax Alert: 31 मार्चपूर्वी ही 4 कामे नक्की करा! नाहीतर करसवलतही नाही वर मोठा दंड आणि व्याजही भरावे लागेल

Pimpri Chinchwad News: ‘भामा आसखेड’बाबत दिरंगाई नको; पिंपरी महापालिका आयुक्तांकडून अधिकाऱ्यांची कानउघाडणी!

SCROLL FOR NEXT