पश्चिम महाराष्ट्र

मतदारांची सोय; प्रशासनावर ताण ! 

सकाळ वृत्तसेवा

सातारा : उदयनराजे भोसले यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्याने सातारा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक विधानसभा निवडणुकीबरोबर जाहीर होण्याची दाट शक्‍यता आहे. तसे झाल्यास त्याचा राजकीय फायदा कोणाला होईल, हे यथावकाश स्पष्ट होईल. मात्र, मतदारांना ते सोयीचे, तर एकत्रित निवडणूक पार पाडताना प्रशासनाची चांगलीच दमछाक होणार आहे. 

राज्यात सध्या पक्षांतराची लाट सुरू असून, त्या लाटेवर माजी खासदार उदयनराजे भोसले हेही स्वार झाले आहेत. दोन लोकसभा निवडणुकांवेळी "मोदी लाट' देशभरात पसरली असतानाही सातारा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात धक्‍काही लागला नाही. मात्र, लोकसभा निवडणूक होऊन तीन महिने उलटताहेत तोपर्यंत पक्षांतराची लाट जिल्ह्यात वेगाने आली. त्यात अनेक आमदार भाजपच्या गळाला लागले. तसेच उदयनराजेही भाजपवासीय झाले. त्यासाठी त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. यामुळे सातारा लोकसभा मतदारसंघाची जागा रिक्‍त झाली असून, या जागेची निवडणूक सहा महिन्यांत नियमाप्रमाणे घ्यावी लागणार आहे. 

विधानसभा निवडणुकीबरोबर लोकसभेची निवडणूक होण्याची दाट शक्‍यता आहे. त्यामुळे प्रशासनाची चांगलीच दमछाक होणार आहे. इव्हीएम मशिन, व्हीव्हीपॅट आदी यंत्रणांसह सर्व साहित्य दुप्पट लागणार आहे. शिवाय, तेवढ्याच मनुष्यबळाचीही आवश्‍यकता लागणार आहे. हे मशिन ठेवण्यासाठी गोडाऊनची जादा आवश्‍यकता भासणार आहे. स्वतंत्र निवडणूक निर्णय अधिकारी, इतर अधिकारी, कर्मचारी नेमावे लागतील. त्यामुळे प्रशासनाला ही निवडणूक एकत्रित लागणार की काय, याची धास्ती लागली आहे. तरीही प्रशासनालाही वेगवेगळी तयारी करावी लागणार नाही, ही बाब प्रशासनाला आशादायक आहे. 

दुसरीकडे मात्र दोन्ही निवडणुका एकत्रित झाल्यास त्याचा फायदा लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांना होणार आहे. शिवाय, राजकीयदृष्ट्या खर्च कमी होऊ शकतो. तसेच लोकप्रतिनिधी, कार्यकर्त्यांना दोन्ही निवडणुकांसाठी वेगवेगळी ताकद खर्च करावी लागणार नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात या निवडणुका एकत्रित व्हाव्यात, अशी आशा आहे. तसेच एकत्रित निवडणुकीमुळे मतदारांनाही मतदान करणे सोयीचे होणार आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT