Ujjani Dam sakal
पश्चिम महाराष्ट्र

उजनी धरणातून शेतीसाठी आजपासून सलग ८० दिवस पाणी! धरणाचे पाच दरवाजे उघडले जाणार; भीमा-सीना जोड कालवा अन्‌ भीमा नदीतूनही सुटणार पाणी

मुंबईत पार पडलेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत उजनी धरणातून सोलापूर जिल्ह्यातील शेतीसाठी सलग दोन आवर्तने सोडण्याचा निर्णय झाला आहे. ६ मार्च ते १५ एप्रिल असे पहिले आवर्तन तर १५ एप्रिलपासून २५ मेपर्यंत दुसरे आवर्तन सोडले जाणार आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : मुंबईत पार पडलेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत उजनी धरणातून सोलापूर जिल्ह्यातील शेतीसाठी सलग दोन आवर्तने सोडण्याचा निर्णय झाला आहे. ६ मार्च ते १५ एप्रिल असे पहिले आवर्तन तर १५ एप्रिलपासून २५ मेपर्यंत दुसरे आवर्तन सोडले जाणार आहे. उद्या (गुरुवारी) शेतीसाठी पाणी सोडण्याकरिता धरणाचे पाच दरवाजे उघडले जाणार आहेत.

उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून शेतीपिकांनाही पाण्याची ओढ बसू लागली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी उजनीतून पाणी सोडण्याची मागणी केली होती. उजनी धरणात सध्या एकूण पाणीसाठा ८९.९० टीएमसीपर्यंत असून त्यात २६.१५ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा (४८.८४ टक्के) आहे. उजनी धरणातील पाणीपातळी उणे २० टक्के झाल्यावर शेतीसाठी कॅनॉलमधून पाणी सोडता येत नाही. त्यामुळे शेतीसाठी दोन आवर्तने सलग सोडण्याचा निर्णय मुंबईत झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. पावसाळ्यापूर्वी सोडणाऱ्या आवर्तनामुळे ३० जून रोजी धरण उणे ३९.५२ टक्के होईल, असा अंदाज आहे. दरम्यान, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली.

बैठकीसाठी जिल्ह्यातील सर्वच आमदार, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता एच. टी. धुमाळ, लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता एस. एस. खांडेकर, कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे, सोमशेखर हरसुरे, मोहन जाधवर, संभाजी माने, भीमा कालवा मंडळाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे, त्यांचे कार्यकारी अभियंता धनंजय कोंडेकर, नारायण जोशी उपस्थित होते. याशिवाय खासदार धैर्यशील मोहिते पाटील व प्रणिती शिंदे हेही बैठकीसाठी ऑनलाइन सहभागी झाले होते.

धरणातून पाणी सोडण्याचे नियोजन

  • शेतीसाठी कालव्यातून पहिले आवर्तन : ६ मार्च ते १५ एप्रिलपर्यंत (८.५० टीएमसी)

  • शेतीसाठी कालव्यातून दुसरे आवर्तन : १५ एप्रिल ते २५ मेपर्यंत (७.५० टीएमसी)

  • भीमा- सीना जोड कालव्यातून पहिले आवर्तन : ६ मार्च ते ४ एप्रिल (२.२० टीएमसी)

  • भीमा-सीना कालव्यातून दुसरे आवर्तन : ५ एप्रिल ते ३ मेपर्यंत (२ टीएमसी)

  • भीमा नदीतून पहिले आवर्तन : ६ ते २० एप्रिल (६.५० टीएमसी)

  • भीमा नदीतून दुसरे आवर्तन : २६ मे ७ जूनपर्यंत (४.५० टीएमसी)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT