water
water 
पश्चिम महाराष्ट्र

अवकाळी पावसामुळे मोहोळमधील पाणीटंचाई दूर

राजकुमार शहा

मोहोळ : गेल्या आठवडयात मोहोळ तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे वाफळे (ता. मोहोळ) येथील 16 सिमेंट बंधारे व 4 कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरले असुन पाझर तलाव निम्मे भरले आहेत, यामुळे गावाला जाणवणारी भीषण पाणी टंचाई दुर झाली असल्याची माहीती मोहोळ येथील लघुपाटबंधारे विभागाचे सहाय्यक अभियंता पंडीत भोसले यांनी दिली.

मोहोळ तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातुन अनेक जलसंधारणाची कामे मोठया प्रमाणात  झाली आहेत. वाफळे व परिसरातील नागरीकांना कायम पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. त्यामुळे पिण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायम भेडसावतो. लघुपाटबंधारे विभागाच्या वतीने वाफळे येथील 17 पाझर तलावांची दुरूस्ती व गळती बंद करण्यात आली होती . तर खोलीकरण ही करण्यात आले होते. गावा शेजारील ओढयाचे रुंदीकरण व खोलीकरणही करण्यात आले होते.

गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे वाफळे येथील सिमेंट बंधारे व कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरले तर पाझर तलाव निम्मे भरले आहेत. यामुळे पिण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहेच पण परिसरातील विहीरी व बोअर च्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीने करून जास्तीत जास्त ठिबक सिंचनाचा वापर करावा असे आवाहन अभियंता भोसले यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

जे कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत ते महाराष्ट्राला काय सांभाळणार?; PM मोदींची पवारांवर कडवट टीका

Gurucharan Singh : गुरुचरण सिंहने रचलाय बेपत्ता असल्याचा कट ? ; पोलिसांनी व्यक्त केला संशय

Suryakumar Yadav: भारताचा 'मिस्टर 360' सूर्यानं 'बेबी एबी'ला शिकवला कसा खेळायचा सुपला शॉट, पाहा Video

Latest Marathi News Live Update : "चित्रा वाघ यांनी माझी माफी मागावी," अनभिनेते राज नयानी यांचा इशारा

SCROLL FOR NEXT