solapur
solapur 
पश्चिम महाराष्ट्र

"हॉट लाइन मेन्टेनन्स'मुळे सुरळीत राहणार पाणीपुरवठा 

परशुराम कोकणे

सोलापूर : सोलापूरची स्मार्ट सिटीकडे वाटचाल होत असताना अनेक सकारात्मक बदल होत आहेत. महापारेषणच्या सोलापूर विभागानेही अपेक्षित अशी स्मार्ट देखभालीची व दुरुस्तीची जोड दिली आहे. सोरेगाव महापारेषण उपकेंद्रात अत्याधुनिक पद्धतीने लाइव्ह हॉट लाइन मेन्टेनन्स करण्यात येत आहे. विद्युतपुरवठा खंडित न करता हॉट लाइनची दुरुस्ती होत असल्यामुळे यापुढे शहराचा पाणीपुरवठा विस्कळित होण्याचे प्रमाण कमी होणार आहे. 

सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महापालिकेच्या सोरेगाव जलशुद्धीकरण केंद्राला महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या 132 के. व्ही. सोरेगाव या एकमेव उपकेंद्रामार्फत 33 के.व्ही. एक्‍सप्रेस फिडरमधून विद्युत पुरवठा होतो. 132 के.व्ही. मेन बसवर मॉन्सूनपूर्व देखभाल दुरुस्ती करण्यासाठी उपकेंद्र चार ते पाच तास बंद करून देखभाल करणे अपेक्षित असते. चार ते पाच तास उपकेंद्रामधून विद्युतपुरवठा खंडित ठेवून देखभाल दुरुस्ती केली तर सोरेगाव जलशुद्धीकरण केंद्रामधून होणाऱ्या पाणी उपशावर आणि शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होतो. त्यामुळे या देखभालीच्या कामासाठी पाणीपुरवठा केंद्राकडून महापारेषण विभागाला ना हरकत दाखला मिळत नाही. अखंडित विद्युतपुरवठा देण्यासाठी मॉन्सूनपूर्व देखभाल व दुरुस्ती होणेही अत्यंत गरजेचे असते. 

या दोन्ही पेचप्रसंगातून मार्ग काढण्यासाठी 132 के.व्ही. सोरेगाव उपकेंद्राचे प्रमुख उपकार्यकारी अभियंता अमेय केत यांनी लाइव्ह हॉट लाइन मेन्टेनन्स करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे दिला होता. त्यास मंजुरी मिळाली असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर महापारेषणच्या अतिउच्च दाब उष्ण तार मार्ग कक्षाच्या माध्यमातून 132 के.व्ही. सोरेगाव उपकेंद्रात वीजपुरवठा खंडित न करता चालू लाइनवर देखभाल व दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. 

या कामात अतिउच्च दाब उष्ण तार मार्ग कक्षामार्फत अत्यंत कुशल आणि निपुण असे अभियंता व तंत्रज्ञांनी तयार केलेले हॉट सुट व उच्च दर्जाचे विद्युत रोधक उपकरणे वापरून एक लाख 32 हजार व्होल्ट अशा चालू विद्युत प्रवाहात अत्यंत सुरक्षित व यशस्वीरीत्या विद्युत उपकरणांची देखभाल व दुरुस्तीचे काम पार पाडत आहेत. या टीमला अशियातील प्रथम अशा बेंगलोर येथील राष्ट्रीय विद्युत प्रशिक्षण संस्थेने प्रशिक्षण दिल्याची माहिती उपकार्यकारी अभियंता केत यांनी दिली. 

काही विशिष्ट प्रकारच्या देखभालीच्या कामांमध्ये वीजपुरवठा खंडित करूनच काम करावे लागते, असेही उपकार्यकारी अभियंता केत यांनी स्पष्ट केले. हॉट लाइनवर काम करणारी ही टीम संपूर्ण जिल्ह्यतील कामांसाठी वापरता येणार आहे. या कामात उष्ण तार मार्ग कक्षाचे उपकार्यकारी अभियंता कांतीलाल बनसोडे, तंत्रज्ञ चंद्रकांत चौधरी, जमीर शेख, नागेश सोनटक्के, पंकज बुरघाटे, लक्ष्मण मुंडे, त्रिपद शिंदे, शिवसांभ कुमठेकर मोलाची कामगिरी बजावत आहेत. तसेच या कामात सोरेगाव उपकेंद्रातील यंत्रचालक व तंत्रज्ञ यांचे विशेष सहकार्य लाभत आहे. हे काम अधीक्षक अभियंता अरुण वाघमारे, कार्यकारी अभियंता हरिभाऊ जाधवर व मिलिंद बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. 

अत्याधुनिक पद्धतीच्या देखभालीमुळे चालू विद्युत पुरवठ्यामध्ये काम कर्मचाऱ्यांना करता येत आहे. सोरेगाव उपकेंद्रातील विद्युतपुरवठा खंडित होत नसल्यामुळे शहराचा पाणीपुरवठा देखील विस्कळित होत नाही. स्मार्ट सिटीच्या दिशेने जाताना महापारेषण विभागाच्या वतीने हा सकारात्मक बदल करण्यात आला आहे. 
- अमेय केत, उपकार्यकारी अभियंता, महापारेषण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi in Dharashiv: अमेरिकेत व्हाईट हाऊसमध्ये जेवणाच्या टेबलवर होतं 'सूपरफूड'; मोदींनी सांगितला किस्सा

T20 WC 24 South Africa Squad : दक्षिण आफ्रिकेने टी-20 वर्ल्ड कपसाठी संघाची केली घोषणा! 2 अनकॅप्ड खेळाडूंची ताफ्यात एन्ट्री

Indian Navy: "कोणत्याही आव्हानासाठी नौदल कायम सज्ज," पदभार स्वीकारताच नवे नौदल प्रमुख गरजले

BV Srinivas : खोटे आश्वासन देणाऱ्या मोदी सरकारला या निवडणूकीतुन हद्दपार करा : बी. व्ही. श्रीनिवास

Latest Marathi News Live Update : अमित शहा यांचा ए़िडिटेड व्हिडिओ शेअर केल्याच्या आरोपावरून काँग्रेस आमदाराच्या 'पीए'ला अटक

SCROLL FOR NEXT