weather update june average rainfall in belgaum 253 mm rainfall in four months
weather update june average rainfall in belgaum 253 mm rainfall in four months esakal
पश्चिम महाराष्ट्र

बेळगाव : जुनमध्ये सरासरी ६० मिमी पाऊस

सतीश जाधव

बेळगाव : जुन महिन्यात गेल्या २३ दिवसात सरासरी फक्त ६०.८१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जून महिन्यात सरासरी १०७ मिमी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. यंदा आतापर्यंत जुन महिन्यात सरासरीपेक्षाही कमी पाऊस झाला आहे. पुढील आठ दिवसात पाऊस झाल्यास ही सरासरी पूर्ण होणार आहे. या २३ दिवसात सर्वाधिक रामदुर्गमध्ये ११०.५ मिमी तर सर्वात कमी कागवाडमध्ये २३.४ मिमी नोंद झाली आहे. तर मार्च ते आतापर्यंत चार महिन्यात २५३.०१ मिमी पाऊस झाला आहे.

गेल्या २३ दिवसात अथणीत २५ मिमी, बैलहोंगल ८१.०२ मिमी, बेळगाव ५०.४ मिमी, चिकोडी १०१.०७ मिमी, गोकाक ६९.१ मिमी, हुक्केरी ४१.०३ मिमी, कागवाड २३.४ मिमी, खानापूर ४१.७ मिमी, कित्तूर ४६.१ मिमी, मुडलगी ४८.०६ मिमी, निपाणी ७५.८ मिमी, रायबाग ७४.१ मिमी, रामदुर्ग ११०.०५ मिमी, सौंदत्ती ६२.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मार्च महिन्यातही सरासरी ८.३ मिमी पाऊस पडण्याची नोंद झाली आहे. दरवर्षी एप्रिल महिन्यात सरासरी २८ मिमी पाऊस पडण्याचा अंदाज असतो. मात्र, यंदा सरासरी ७४.८१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक बेळगाव तालुक्यात १६७ मिमी तर सर्वात कमी सौंदत्तीत ४४.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यंदाच्या मे महिन्यातही अनेक वेळा अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. मे महिन्यात सरासरी ७० मिमी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. मात्र, यंदा सरासरी १०९.०९ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. मे महिन्यात मुडलगीत सर्वाधिक १६९.५ मिमी तर सर्वात कमी रामदुर्गमध्ये सर्वात कमी ५१ मिमी पाऊस झाला आहे.

महिना झालेला पाऊस (मिमी)

  • मार्च - ८.३

  • एप्रिल - ७४.८१

  • मे - १०९.०९

  • जून - ६०.८१

  • एकूण - २५३.०१

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT