Saundatti Yellamma esakal
पश्चिम महाराष्ट्र

Saundatti Yellamma : सौंदत्ती डोंगरावर 'कडक भाकरी'ची कशी झाली सुरुवात, या भाकरीला का आहे महत्त्व? जाणून घ्या..

Saundatti Yellamma Dongar Bhakri : सौंदत्ती डोंगरावर असणाऱ्या काही लमाणी आणि स्थानिक कुटुंबाकडून कडक भाकरी तयार करून त्याची विक्री केली जाते.

विनायक जाधव

पूर्वी बैलगाडी घेऊन भाविक देवीच्या डोंगराकडे निघत. सोबत शिदोरीही घेत होते. यात्रा काळात रोज भाकरी तयार करणे शक्य नसल्याने कडक भाकरीची सुरुवात झाली.

Saundatti Yellamma Dongar Bhakri : कटक रोट्टी (कडक भाकरी) हा शब्द सौंदत्ती यल्लमा देवीच्या (Saundatti Yellamma Devi) दर्शनाला जाणाऱ्या महाराष्ट्रातील भाविकांना देखील चांगलाच परिचयाचा आहे. कारण सौंदत्ती डोंगरावर (Saundatti Dongar) गेल्यानंतर ही भाकरी खाल्ल्याशिवाय बहुतेक कोणताही भाविक माघारी परतणार नाही. केवळ सौंदत्तीतच नाही तर बेळगावसह उत्तर कर्नाटकातील भाविकही भाकरी आवर्जून आपल्या घरी ठेवतात. पण सौंदत्तीच्या डोंगरावर मिळणाऱ्या भाकरीची चवच न्यारी.

सौंदत्ती डोंगरावर असणाऱ्या काही लमाणी आणि स्थानिक कुटुंबाकडून कडक भाकरी तयार करून त्याची विक्री केली जाते. या ठिकाणी दोन कडक भाकऱ्यांसमवेत सोबत मोड आलेल्या मुगाची भाजी (हिरव्या मिरच्यांची चटणी घालून), वांग्याची भाजी, थोडे दही, काळ्या तिळाची चटणी, भुईमूग शेंगाची चटणी दिली जाते. काही वेळेस काळे तीळ घालून तयार केलेली वांगी, बटाटा, मिक्स भाजी देखील मिळते. ही भाजी अत्यंत रुचकर असते.

यासाठी २० ते ३० रुपये आकारणी केली जाते. त्यामुळे बहुतेक जण आवर्जून जेवणासाठी म्हणून ही भाकरी त्यासोबत दिले जाणारे पदार्थ घेतात. ही चव अन्य कुठेही सापडणार नाही. जोंधळा किंवा बाजरीपासून या भाकऱ्या तयार केल्या जातात. सौंदत्तीची वर्षातून दोन वेळा मोठी यात्रा भरते. डिसेंबर महिन्यांत महाराष्ट्रातील भाविक देवीचे दर्शन घेतात. जानेवारी महिन्यात होणाऱ्या यात्रेत बेळगावसह उत्तर कर्नाटकाचे भाविक दर्शनाला जातात. देवीच्या यात्रेत भाविक तीन दिवस डोंगरावरच वास्तव्य करतात. देवीची सामूहिक गाव पातळीवर पडली देखील भरली जाते. ही परंपरा आजही कायम आहे.

पूर्वी बैलगाडी घेऊन भाविक देवीच्या डोंगराकडे निघत. सोबत शिदोरीही घेत होते. यात्रा काळात रोज भाकरी तयार करणे शक्य नसल्याने कडक भाकरीची सुरुवात झाली. अत्यंत पातळ पापडाप्रमाणे भाकरी तयार करून ती वाळविली जाते.‌ त्यामुळे अशी भाकरी भरपूर दिवस टिकते. सध्या अशा भाकऱ्या तयार करण्यासाठी यंत्रांचा देखील आता वापर केला जाऊ लागला आहे. त्यामुळे अशी पातळ भाकरी करून त्याची विक्री मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे, असे जरी असले तरी सौंदत्ती डोंगरावर हाताने बडवून तयार होणारी कडक भाकरी आणि त्यासोबत दिली जाणारी भाजी-चटणी असे पदार्थ विशेष भाव खाऊन जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT