wife Knife attack
wife Knife attack sakal
पश्चिम महाराष्ट्र

बेळगाव : पत्नीवर चाकू हल्ला करून खून

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : किल्ल्यातील वर्दळीच्या परिसरात पत्नीवर चाकू हल्ला करून खून करण्यात आल्याची घटना आज (ता.२५) दुपारी घडली. हिनाकौसर मंजूरईलाही नदाफ (वय ३०, रा. गांधीनगर) असे मयत महिलेचे नाव आहे. कौटुंबिक कलहातून हल्ला घडल्याची प्राथमिक माहिती आहे.

याबाबत माहिती अशी की, पती मंजूरईलाही नदाफ (रा. गांधीनगर) व पत्नी हिनाकौसरमध्ये कौटुंबिक वाद होता. न्यायालयात याबाबत खटला सुरु आहे. कौसर आज (ता.२५) कौटुंबिक न्यायालयामधील दाव्याच्या सुनावणीला आल्या होत्या. या दरम्यान उभयंत्यात शाब्दीक चकमक उडाली. मात्र, परत पती-पत्नी किल्ल्याजवळ अमोरासमोर आले. त्याठिकाणी कौटुंबिक विषयावरून कडाक्याचे भांडण झाले. यावेळी पतीने चाकू हल्ला केल्यामुळे कौसर जखमी झाल्या. वैद्यकीय उपचारासाठी घेऊन जात असताना मृत्यू झाला आहे.

दरम्यान, वर्दळीच्या ठिकाणी हल्ला झाल्यामुळे एकच खळबळ उडाली. मार्केट पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी दाखल झाले. महिलेला तातडीने वैद्यकीय उपचारासाठी पाठविताना घटनास्थळी झालेली गर्दी हटवली. वाहतुकीसाठी मार्ग करून दिला. तसेच घटनेनंतर जिल्हा रुग्णालय येथे बंदोबस्त वाढविला आहे.

धावले मार्केट पोलिस; हद्द माळमारुती ठाण्याची

किल्ला येथील लेकव्हिव हॉस्पीटलजवळ पती-पत्नीमध्ये भांडण झाले. त्यात महिला जखमी आणि वैद्यकीय उपचारासाठी घेऊन जात असताना मृत्यू झाला. मात्र, सुरवातीला सदर घटना मार्केट पोलिस ठाण्याच्या हद्दीत झाल्याचे समजून तपास सुरु केला. मात्र, चौकशीअंती हल्ला माळमारुती पोलिस ठाणे अखत्यारितील घडल्याचे स्पष्ट झाले. यामुळे माळमारुती पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

MI vs KKR Live IPL 2024 : अय्यरची 70 धावांची खेळी, मुंबईसमोर विजयासाठी 170 धावांच आव्हान

SSC-HSC Result 2024 : सीबीएसईचा दहावी-बारावीचा निकाल २० मे नंतर होणार जाहीर

West Indies T20 WC 24 Squad : विंडीजच्या संघात सगळे स्टार मात्र इन फॉर्म जादूगारच मिसिंग

SCROLL FOR NEXT