Wild Animals Sakal
पश्चिम महाराष्ट्र

Itkare News : वन्य प्राण्यांच्या अपघाती मृत्यूत वाढ

आशियाई महामार्गावरील इटकरे-येडेनिपाणी फाटा ते येलूर या पाच किलोमीटर अंतरात बिबट्यासह अन्य वन्य प्राणी अपघातात जखमी होऊन मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे.

दीपक पवार

इटकरे - आशियाई महामार्गावरील इटकरे-येडेनिपाणी फाटा ते येलूर या पाच किलोमीटर अंतरात बिबट्यासह अन्य वन्य प्राणी अपघातात जखमी होऊन मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. इटकरे फाट्याच्या दोन किलोमीटर अंतरात अडीच वर्षांत सहा बिबटे, एक तरस, कोल्ह्याचा मृत्यू झाला तर एक बिबट्या गंभीर जखमी झाला. ते टाळण्यासाठी वन्य प्राणी प्रवण क्षेत्राच्या अनुषंगाने उपाययोजना राबवणे आवश्‍यक आहे.

आशियाई महामार्गाच्या दोन्ही बाजूला वनीकरणात झाडी वाढली आहे. पूर्वेस येडेनिपाणीचा मल्लिकार्जुन डोंगर, पश्चिमेस तुकाई डोंगर आहे. लागून ऊस लागवड क्षेत्रही मोठे आहे. त्यामुळे बिबट्यासह अन्य वन्य प्राण्यांचा वावर परिसरात वाढला आहे. मात्र, त्यांचे भक्ष्य असणारे प्राणी परिसरात नसल्याने ते भक्ष्याच्या शोधार्थ नागरी वस्तीपर्यंत येत आहेत. शेतवस्तीवरील कुत्र्यांना बिबट्यांनी लक्ष्य केले आहे.

स्वतः व बछड्यांना जगवण्यासाठी बिबटे अन्नाच्या शोधार्थ सातत्याने रस्ता ओलांडत आहेत. महामार्गावर वाहनांची गती अधिक असल्याने रस्ता ओलांडताना बिबटे जखमी होऊन त्यांच्यावर मृत्यू ओढवत आहे, काही जखमी होऊन अधिवासात जातात. त्यामुळे त्यांची गणनाच होत नाही. रस्त्यावरील ढाबे व हॉटेलमधील मांसाहारातील शिल्लक अन्न परिसरात टाकल्यामुळे कुत्र्यांची संख्या वाढली आहे. या कुत्र्यांच्या शोधार्थ बिबटे महामार्गापर्यंत येतात.

मात्र तिथे येताना किंवा जाताना महामार्गावरील वाहनांना धडकतात. वन्य प्राण्यांना ये-जा करण्यासाठी तसेच प्रवाहासाठी छोटे पूल आहेत. मात्र रुंदीकरणात ते बंद आहेत किंवा त्यातून वन्यप्राणी जात नाहीत. वनीकरण विभागाने येलूर ते येडेनिपाणी फाट्याच्या पुढे काही अंतर ‘वन्यप्राणी प्रवण क्षेत्र’ घोषित करावे. तेथे आवश्यक उपाययोजना कराव्यात. ठिकठिकाणी फलक लावणे, त्यावर सूचना व प्राण्यांची चिन्हे दर्शविणे, रस्त्यावर पट्टे मारणे, जाळी लावणे अशा उपाययोजना राबवणे आवश्‍यक आहे.

महामार्गावर अपघातात बिबटे जखमी होणे, त्यांचा मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. अशी अपघातस्थळे पाहून त्या ठिकाणी वन्य प्राणी सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याचे नियोजन आहे. वन कर्मचाऱ्यांकडून गस्त घालणे अथवा अन्य उपाययोजनांच्या माध्यमातून काळजी घेता येईल.

- एकनाथ पारधी, वन क्षेत्रपाल, शिराळा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Independence Day Live Update : मोदींचा मोठा संकल्प; स्वावलंबी भारतासाठी देशाला दिला खास संदेश

ASIA CUP 2026: जेमिमा रॉड्रिग्स आशिया कप आणि आशियाई खेळांमधून बाहेर; BCCI चा मोठा निर्णय, ‘या’ धडाकेबाज फलंदाजाला मिळाली संधी

शहर हद्दीतही दोन्ही बाजूला ३० मीटरचेच बंधन! महामार्गांलगतच्या हॉटेल, ढाब्यांवर ६० दिवसांत हातोडा; जिल्हाधिकाऱ्यांकडून ‘कृती दल’ स्थापन, वाचा...

Tricolor Cheese Toast Recipe: या स्वातंत्र्यदिनाला नाश्त्यात करा काहीतरी हटके! १० मिनिटांत बनवा चीजने भरलेला ‘तिरंगा टोस्ट’

Career Horoscope: सरकारी नोकरीत मिळवतात यश; ‘या’ राशींना मिळते नशिबाची साथ, करिअरमध्ये करतात मोठी प्रगती, तुमची रास कोणती?

SCROLL FOR NEXT