without mask people fine in belgaum for yesterday in belgaum 
पश्चिम महाराष्ट्र

बेळगावकर आता मास्क घालाच, नाहीतर होईल कारवाई

सतीश जाधव

बेळगाव : कॅन्टोन्मेंट बोर्डाने अखेर आजपासून विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरवात केली आहे. पहिल्या दिवशी ९५ जणांकडून नऊ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सीईओंनी दिली.

कॅण्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय दोन महिन्यांपूर्वी झालेल्या बोर्डाच्या बैठकीत 
घेण्यात आला होता. मात्र, कॅन्टोन्मेंटकडे मनुष्यबळाची कमतरता असल्याने ही कारवाई दोन महिने रखडली होती. अखेर शनिवारी याला मुहूर्त  मिळाला आहे. विनामास्क फिरणाऱ्या प्रत्येकाकडून १०० रुपये दंड आकारणी केली जात आहे. शनिवारी दुचाकी, चारचाकी वाहनधारकांकडून नऊ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला.

कॅण्टोन्मेंट कार्यालय ते आयनॉक्‍स थिएटर या दरम्यान ही कारवाई करण्यात आली. यानंतर रोज ही कारवाई केली जाणार आहे. कारवाई करताना बोर्डाचे १० हून अधिक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. अनेकांनी अधिकाऱ्यांशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, अधिकाऱ्यांनी समजावून सांगितल्यानंतर त्यांनी दंडाची रक्कम दिली.

आता कॅन्टोन्मेंट हद्दीतही विनामास्क फिरणाऱ्यांवर कॅण्टोन्मेंट बोर्डाची नजर असणार आहे. कोरोनापासून स्वतःच्या बचाव करण्यासाठी मास्क गरजेचा आहे. मास्कचा नियमित  वापर करा, अशा सूचना सरकारने केल्या आहेत. तरीही कॅण्टोन्मेंट हद्दीत विनामास्क फिरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अखेर कारवाईला सुरवात झाली आहे. लोकांना आता मास्क घालावाच लागणार आहे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT